शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

चाऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर

By admin | Updated: December 23, 2015 00:09 IST

परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता.

बारामती : परतीच्या अवकाळी पावसाने दिलासा दिल्यामुळे मागील दोन महिन्यांत चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. यापूर्वीच जनावरांसाठी चारा डेपोसाठी बारामती तहसीलदारांकडून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यामध्ये तब्बल ३२ गावांचा समावेश आहे. साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीमध्ये हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. त्यादृष्टीने तयारी प्रशासनाने केली आहे, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दिली.बारामती तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद होत आहे. त्यातच आता तब्बल लाखभर पशुधनासाठी या जनावरांना खाण्यासाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी मिळणेही दिवसेंदिवस जिकिरीचे बनत चालले आहे. मध्यंतरी अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात चारा पिके तरली. त्यामुळे दोन महिने जनावरांना चारा पुरला. आता परिस्थिती बदलत आहे. यापूर्वी बारामती तालुक्यातील प्रमुख चार महसुली गावांमधील तब्बल ३२ वाड्या-वस्त्यांवर जनावरांसाठी चारा आणि पाणीच नसल्याने तत्काळ चारा डेपोसुरू करण्याची मागणी तहसील कार्यालयाकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील उंडवडी, सुपे, सुपा, मोरगाव, लोणी भापकर या मंडल गावांच्या परिसरातील सुमारे ३२ गावे, तसेच वाड्या-वस्त्यांवर पाण्याची तसेच चाऱ्याची प्रचंड टंचाई आहे. या गावांमध्ये लहान ४९ हजार ५५८, तर मोठी २५ हजार १३८ जनावरे आहेत. या जनावरांसाठी दररोज सुमारे १० हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यानुसार, तीस हजार क्विंटल चाऱ्याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात तीन-चार हजार क्विंटल चाराच या जनावरांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे या मंडल गावांकडून चारा डेपो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून त्यानुसार तहसील कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)जलयुक्तने तारले...दुष्काळी पट्ट्यात असलेल्या या गावांमध्ये दरवर्षी काही प्रमाणात का होईना, पण पाऊस झाल्याने चाऱ्याची समस्या सुटते. मात्र, या वर्षी आॅगस्ट संपला तरी दरवर्षीच्या सरासरीच्या अवघा २८६ मिमी पाऊस पडला आहे. त्यात दुष्काळी पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे. परतीच्या अवकाळी पावसाने दुष्काळी गावांना तारले. त्यातच जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसाचे पाणी भूगर्भात जिरविणे शक्य झाले. त्यामुळे विहीर, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढली. आता ही परिस्थितीदेखील बदलत आहे. पाण्याच्या टँकरबरोबरच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.