शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

गणेशोत्सवात वाढला ‘ती’चा सहभाग

By admin | Updated: September 29, 2015 02:09 IST

गणेशोत्सवात ‘ती’ची आघाडी सरस ठरली. पुरुषांच्या तोडीस तोड महिलांच्या उत्स्फुर्त सहभागाने गणेशोत्सव अजरामर ठरविला.

पिंपरी : गणेशोत्सवात ‘ती’ची आघाडी सरस ठरली. पुरुषांच्या तोडीस तोड महिलांच्या उत्स्फुर्त सहभागाने गणेशोत्सव अजरामर ठरविला. गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत ‘ती’चीच आघाडी होती. मिरवणुकीत ढोल वाजविण्यापासून ते विसर्जनापर्यंत ‘ती’चा सहभाग वाढलेला दिसला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये महिला खास आकर्षण ठरल्या. पारंपरिक नृत्य करण्यापासून ते विसर्जनादरम्यान ‘मोरया’चा गजर करण्यातही ‘ती’च पुढे होती. कुटुंबाच्या सुरक्षितेबरोबरच जनतेच्या सुरक्षेसाठी‘ती’ने पहाटेपर्यंत मिरवणुकीच्या गर्दीला तोंड दिले. ढोल-ताशाच्या आवाजाने महिलांनी चारही दिशा गाजविल्या. विसर्जन मिरवणुकीचा झेंडा मिरविण्यासाठीही महिलांचाच सहभाग होता. पोवाडा गाण्यातही महिलांनी किताब पटकविला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून हजारोंमध्ये नृत्य करण्यातही महिला मागे राहिल्या नाहीत. लावणी असो की, डॉल्बी; नृत्य करण्यातही महिलाच पुढे होत्या. आरोग्याच्या दृष्टीने घाटावरील स्वच्छता ते निर्माल्य जमा करण्यापर्यंत महिलांनी उल्लेखनीय काम केले. ढोल-ताशा महासंघात रात्री १२ पर्यंत मिरवणूक आकर्षक करण्यातही ‘ती’चा सहभाग गतवर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी वाढलेला दिसून आला आहे. स्वयंसेवी महिलांसमवेत पोलीस महिलांनीही अलोट गर्दीच्या समूहाला पेलण्याचे काम केले. घरची मिरवणूक सोडून नागरिकांच्या गर्दीला तोंड देण्याचे आवाहन त्यांनी पेलले. ढोल-ताशा पथकातही घाम गळेपर्यंत महिलांनी ढोल व ताशा वाजविला. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांचा संदेश समाजापर्यंत महिलांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिला. अनेक पथनाट्येही या वर्षी महिलांनी सादर केली. गणेशोत्सवात महिलांचा उत्साह चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. शहरभरात ठिकठिकाणी जाऊन गणेश मंडळांपुढे जाऊन पोवाडाही गायला. पोलीस मित्र म्हणून विसर्जनात गर्दीचे आव्हान पेलले. यामध्ये सफाई कर्मचारी महिलांचेही तेवढेच योगदान राहिले. एकविसाव्या शतकात हे चित्र मात्र बदललेले दिसले. टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव आज सार्थक ठरला, असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही. मंडळाचे अध्यक्षपदही महिलांनी गाजवले. वर्गणी जमा करण्यापासून ते मंडळाची देखभाल, सजावट, विविध स्पर्धांमध्ये ‘ती’चा सहभाग उत्स्फूर्त राहिला. (प्रतिनिधी)---जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात आमचे पोवाडा पथक पोहोचले आहे. महिलांनी एकत्रित येऊन पोवाडा गाणे व समाजप्रबोधन करणे हे आव्हानात्मक आहे. पोवाड्याच्या माध्यमातून स्त्री सबलीकरण व स्त्री भ्रूणहत्येचे काम केले. ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘ती’च्या गणपतीची संकल्पना ही अतुलनीय आहे. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत, हे गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिसून आले आहे. - शीतल कापशीकर,संजीवनी शाहिरी पथक, प्राधिकरण----दर वर्षीप्रमाणेच गणेश विसर्जनाला अलोट गर्दी होती. जनसमुदाय आवरणे कठीण होते. कुटुंबाला वेळ देता येत नाही. मात्र, विसर्जनाच्या मिरवणुकीची पहाटे तीनपर्यंत ड्युटी करावी लागते. पहिल्यासारखे आता राहिले नाही. पुरुषांप्रमाणेच महिलांना ड्युटी दिली जाते. दोन वर्षांपासून मी विसर्जन मिरवणुकीची रात्रपाळी करीत आहे. वेगवेगळे अनुभव यादरम्यान येतात. मात्र, कर्तव्य पार पाडायचे ठाम असते. - ज्योत्स्ना पाटील,पोलीस उपनिरीक्षक, सांगवी