शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाबळला पाण्यासाठी महिला आक्रमक

By admin | Updated: March 22, 2017 02:59 IST

येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास

पाबळ : (ता. शिरूर) येथील गावठाणातील नळपाणी पुरवठा बंद असल्याने येथील महिलांनी पाबळ ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला. या वेळी महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरून तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी-निवेदन देऊन केली असून दोन-तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.या वेळी पाबळच्या सरपंच मनीषा बगाटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी डहाळे, अमोल जाधव, संजच चौधरी, नामदेव जगताप, ग्रामविकास अधिकारी बी. बी. गोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. येत्या दोन ते तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या वेळी ग्रामसेवक गोरे यांनी दिले.संतप्त महिलांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर नळपट्टी व कर वसुली देऊनसुद्धा नेमके गावठाणाला पाणी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी येत्या काळात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सामूहिक सदस्यपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.शिरूरच्या दुष्काळी पट्ट्यातील पाबळ गावाला थिटेवाडीचे वरदान लाभले. या ठिकाणी गावठाणासाठी विहीर घेऊन पाणी योजना राबविण्यात आली आहे. काहीसे पाणी असताना १० दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने वीजबिल थकवल्याने येथील विद्युत जोड तोडण्यात आले. सुमारे १८ लाख रुपये थकीत बिल असल्याने विहिरीवरील वीजजोड तोडण्यात आले. सुमारे ४ ते ५ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावठाणात सध्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरोघरी जाऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, अनेक नागरिकांनी पाणी मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असून, पाणी मिळवताना महिलांची भांडणे होत आहे. तर, अनेकांनी स्वतंत्र पैसे देऊन खासगी टँकरद्वारे पाणी घेणे पसंत केले असून, आठवड्याला १००० ते २००० रुपयांचा आर्थिक फटका अनेक नागरिकांना बसला आहे. येथील नळपाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)