शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांत टोळी युद्धाची भीती

By admin | Updated: June 22, 2015 04:23 IST

राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या

यवत : राहू (ता.दौंड) येथे वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याला त्या वेळी खून झालेल्या सोनवने बंधूंच्या भावांनी इतर साथीदारांच्या मदतीने जीवे ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची तक्रार जगताप याने यवत पोलिसांत दिली आहे. सदर घटनेनंतर गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली असून, टोळी युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वाळूच्या वादातून झालेल्या दुहेरी खून खटल्यातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप बारामती न्यायालयातून जात असताना, त्याला मारण्यासाठी मागावर असलेल्या चार आरोपींना यवत पोलिसांनी खामगाव फाटा (ता.दौंड) नजीक सापळा रचून पकडले होते. सदर आरोपींकडे दोन गावठी कट्टे व दहा राऊंड मिळून आले होते.संतोष जगताप, समीर जगताप, अप्पा लोंढे, महेश लगाड़े व त्याच्या इतर २२ साथीदार यांच्या विरोधात गणेश शिवाजी सोनवने व रमेश सोपान सोनवने यांचा राहू येथे खून केल्याचा खटला सुरू आहे. संतोष जगताप हा (दि.१८) रोजी त्याचा भाऊ समीर जगताप व इतर सहकाऱ्यांसह बारामती न्यायालयात तारीख असल्याने तिथे गेले होते. न्यायालयातील तारीख संपल्यानंतर, संतोष जगताप व त्याचे सहकारी परत जात असताना सदर प्रकार घडला होता. दरम्यान, संतोष जगताप याने याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून सदर फिर्यादीत सन २०११ मध्ये सोनवने यांच्या बरोबर झालेली भांडने याचा राग मनात धरून उमेश सोनवने, अनिल सोनवने, संदीप सोनवने ( सर्व रा. राहु, ता. दौंड), महेश शेळके (रा.पारगाव, ता. दौंड), स्वप्निल शेलार (रा.देलवडी, ता. दौंड) यांनी आरोपी अशिद रशीद रियासन अली ( वय २२ , रा.सीलमपुर थाना, जे ९ , सीलमपुर, दिल्ली ६ ), दिलशान इरशाद खान (वय २३, रा. हापड रोड, जाकीर कॉलनी, नं.३२४, मेराड, उत्तर प्रदेश), जावेद नसीर खान (वय २१) यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे म्हटले आहे. (वार्ताहर)