शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो : पवार

By admin | Updated: December 25, 2016 04:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेच्या महिलांच्या सर्व जागा निवडून आणल्या आहेत. पण निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो, हे दिसून आले आहे, अशा परखड शब्दांत

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकेच्या महिलांच्या सर्व जागा निवडून आणल्या आहेत. पण निवडणुकीत फाजिल आत्मविश्वास नडतो, हे दिसून आले आहे, अशा परखड शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांना व कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने बारामतीचा गड राखण्यात यश मिळवले असले तरी पुणे जिल्ह्यामध्ये मात्र राष्ट्रवादी कुठेही त्यांचा दबदबा राखू शकलेली नाही. येत्या काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केले. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी नूतन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ३५ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना या सर्व बाबींचा विचार केला जाईल. एकाच प्रभागात एखादा उमेदवार दीड हजाराच्या फरकाने निवडून येतो. मात्र, दुसरा उमेदवार पराभूत होतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. यंदा बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काही नवखे चेहरे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले, तर आजी-माजी नगराध्यक्षांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे बारामतीमध्ये बहुमत मिळाले असले तरी संपूर्ण निकालाचे आत्मपरीक्षण करावे लागेल, असे पवार म्हणाले. बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी आभार मानले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, वैशाली नागवडे, किरण गुजर, सतीश तावरे, पुरुषोत्तम जगताप, अमर धुमाळ, राहुल वाबळे आदी उपस्थित होते. यशाने हुरळू नका, खचूनही जाऊ नका...निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी योग्य प्रकारे भूमिका सभागृहात मांडल्या पाहिजेत. गेल्या महिन्याभरात प्रचार करताना नागरिकांनी मांडलेले प्रश्न, तक्रारी व्यवस्थितपणे सोडविल्या पाहिजेत. लवकरच बारामतीच्या विकासाचा आराखडा बनविण्यासाठी नवनिर्वाचित नगगराध्यक्षा व नगसेवक आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, तर चार जागा गेल्याने खचूनदेखील जाऊ नका, असे पवार म्हणाले.