शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मॉन्सून वाटचालीसाठी अनुकूल स्थिती

By admin | Updated: May 24, 2017 04:11 IST

मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मंगळवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच सायंकाळच्या सुमारास हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे मान्सून वेळेवर येण्याची चिन्हे आहेत. आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर चक्रवात असल्याने नैर्ऋत्य मोसमी पावसाची वाटचाल नैर्ऋत्य, आग्येन व पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४६.६ अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तापमान १७.६ अंश सेल्सिअस अहमनगर येथे नोंदविले गेले.विदर्भात तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट कायम असून येत्या २४ मेपर्यंत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. येत्या २५ मे रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून २६ मे रोजी दक्षिण कोकण- गोवा, दक्षिण मध्य- महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात येत्या २६ मेपर्यंत आकाश अंशत: ढगाळ राहिल.राज्याच्या प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे : ३८.८, लोहगाव : ३९.२, अहमदनगर : ४०.७ , जळगाव : ४१.२, कोल्हापूर : ३७.८, महाबळेश्वर : ३२.१, नाशिक : ३८.०, सांगली : ३९.५, सातारा : ३८.९, सोलापूर : ४१.९, मुंबई : ३३.७, अलिबाग : ३२.९ , रत्नागिरी : ३४.५, पणजी : ३४.८, औरंगाबाद : ४0.४, परभणी : ४२.८, डहाणू : ३४.३, अकोला : ४३.३, अमरावती : ४१.२, बुलडाणा : ४०.२, ब्रह्मपुरी : ४५.३, चंद्रपूर : ४६.६, गोंदिया : ४३.८, नागपूर : ४४.९, वाशिम : ४१.८, वर्धा : ४४.२, यवतमाळ : ४२.५.