शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला पाण्यात फेकून पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:38 IST

आठ महिन्याच्या लेकीसह वडील खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याचे सोमवारी प्रथमदर्शी वाटले असले तरी पोटच्या मुलीला धरणात फेकून बापाने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : आठ महिन्याच्या लेकीसह वडील खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याचे सोमवारी प्रथमदर्शी वाटले असले तरी पोटच्या मुलीला धरणात फेकून बापाने स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.सुनील विजय दणाणे (३२) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सुनील पत्नी गौरी दुणाणे समवेत त्यांच्या जान्हवी या आठ महिन्यांच्या मुलीसह खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असणा-्या पिकनिक स्पॉटवर सोमवारी सायंकाळी फिरायला आला होता. यावेळी त्याने पत्नीकडून मुलीला हिसकावून घेत तिला पाण्यात फेकून दिले. त्यानंतर स्वत: देखील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नदीपात्रात दोघेही दिसेनासे झाले. पत्नीने आरडाओरडा केला असता नागरिक तिथे पोहोचले.नागरिकांनी अग्निशामकदलास दिलेल्या माहितीनुसार, धरणातून पाणी सोडलेल्या ठिकाणी गेल्यावर सुनील याने पत्नीकडून बाळाला हिसकावून घेतले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्या बाळास पाण्यात फेकून दिले. तसेच स्वत: देखील पाण्यात उडी मारली.बाप आणि मुलगी खडकवासला धरण परिसरात बुडाले असल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. दोघांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा जवानांनी शोध घेतला असता धरणामध्ये एका झाडाच्या बाजूला सुनील याचा मृतदेह सापडला. मात्र मुलीचा सापडू शकला नाही. सुनील याने मद्यप्राशन केले होते. नशेमध्ये त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. तांडेल शिवाजी मुंजमळे, फायरमन प्रमोद मरळ, निलेश पोफळे, शिवाजी आवळे, रमेश चव्हाण आणि ड्रायव्हर सातपुते यांनी ही कामगिरी केली.