शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

मुलाला कमी गुण मिळाले म्हणून पित्याची आत्महत्या

By admin | Updated: May 30, 2017 23:07 IST

दहावीत ९१ टक्के गुण मिळविलेल्या मुलाने बारावीच्या परिक्षेत ७१ टक्के गुण मिळविले. नैराश्येपोटी चक्क पित्याने राहत्या घरी...

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 30 - दहावीत ९१ टक्के गुण मिळविलेल्या मुलाने बारावीच्या परिक्षेत ७१ टक्के गुण मिळविले. टक्केवारी घसरली, कमी गुण मिळवून त्याने अपेक्षाभंग केला. यामुळे आलेल्या नैराश्येपोटी चक्क पित्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी गाव येथे मंगळवारी घडली.
विश्वंभर  माधवन पिल्ले (वय ४८ रा. सुखवानी कॉटेज, पिंपरीगाव) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वंभर यांचा मुलगा बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. बारावीचा निकाल जाहीर होणार म्हणून वडील आज सकाळपासूनच अस्वस्थ होते. त्यांच्यामुळे घरात तणावाचे वातावरण होते. दुपारच्या सुमारास मुलाचा बारावीचा निकाल समजला. मुलाला ७१ टक्के गुण मिळाले. एवढे गुण कमी कसे मिळाले, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही वेळाने त्यांनी घरातील बाथरुममध्ये जाऊन गळफास लावून घेतला, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.
विश्वंभर यांचे भोसरीतील लांडेवाडी येथे नुटक इंजिनीयरींग नावाचे वर्कशॉप आहे. मुलाने बारावीमध्ये चांगले गुण मिळवावेत, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र मुलाला गुण कमी मिळाले. अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत चौकशी केली. दरम्यान, आत्महत्येमागे हेच कारण आहे की, अन्य कोणते कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.