सुनील राऊत, पुणेपुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात बाजारपेठही फुलली. या दहा दिवसांच्या उत्सवासाठी बाजारपेठेत हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या उत्सवामुळे तब्बल २५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. व्यावसायिकांसाठी तर हा उत्सव संपूर्ण कुटुंबाची आर्थिक चिंता संपविणारा ठरला आहे. पुण्यात सुमारे ४ हजार मान्यता प्राप्त मंडळे आहेत. तर तेवढीच अनधिकृत मंडळे आहेत. तर या वर्षीची आकडेवारी पाहता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल ४ लाख घरांत गणपती बसले होते. त्यामुळे मूर्तिकारांना रोजगार उपलब्ध झाला. विक्रेत्यांनाही आर्थिक लाभ झाला. त्याचबरोबर सजावटीच्या साहित्याची बाजारपेठही सजली होती. सुमारे दहा लाखांहून अधिक नारळाची विक्री झाली. पारंपरिक मोदकांबरोबर मावा, चॉकलेट यांच्या मोदकांनी दुकाने सजली होती. गणेशोत्सवात तब्बल ३५ ते ४० विविध घटक थेट अर्थकारणाशी संबंधित आहेत. त्यात मांडव उभारणाऱ्यांपासून मोदक बनविणाऱ्या महिलांपर्यंतच्या घटकांचा समावेश त्या घटकांसाठी केलेला खर्च आणि उत्सवासाठीची खरेदी पाहता या वर्षी सुमारे १ हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
बाप्पाने दूर केले ‘आर्थिक’ विघ्न
By admin | Updated: September 11, 2014 04:18 IST