शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला

By admin | Updated: December 24, 2016 00:15 IST

मुळशी तालुक्यातील नोंदणीकृत शाळांत ४० हजार विद्यार्थी शिकत असून त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी मात्र तब्बल ७० शिक्षकांची

पौड : मुळशी तालुक्यातील नोंदणीकृत शाळांत ४० हजार विद्यार्थी शिकत असून त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी मात्र तब्बल ७० शिक्षकांची कमतरता आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२३, खासगी संस्थांच्या ३४ माध्यमिक शाळा व इंग्रजी माध्यमाच्या ४३ अशा एकूण ३०० नोंदणीकृत शाळा आहेत. शिक्षक कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, त्यासंदर्भात काही निवडक शाळा वगळता व्यवस्थापन संस्था व शासनाचा शिक्षण विभाग यांना त्याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्येही त्याच प्रमाणात शिक्षक कमी असल्याचे वास्तव आहे. या ३०० शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक ३० विद्यार्थ्यांच्या मागे १ शिक्षक, असे प्रमाण गृहीत धरले, तर तालुक्याची एकूण शिक्षकांची गरज १, ३३४ एवढी आहे. यातील जि. प.च्या प्राथमिक शाळांना आजही ७० शिक्षकांची कमतरता आहे. हा आकडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध आहे. खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांचा विषय जि. प.च्या माध्यमिक विभागाच्या अखत्यारित असल्याने त्याची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे नसल्याचे या विभागाने कळविले आहे. जि. प. शाळांच्या तुलनेतच माध्यमिक शाळांमध्येही पात्र शिक्षकांची मोठी कमतरता आहे. याबाबतीत काही जागरूक पालकांनी शाळांमध्ये चौकशी केली असता, शिक्षकभरती हा शासनाचा विषय असल्याने आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगितले जाते. शासनाने काही वर्षांपासून नव्याने शिक्षकभरती थांबवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन हा नियम लागू केला असल्याने संस्थाचालक आपल्या संस्थांच्या शाळांमध्ये कमतरता असूनही विद्यार्थिसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची आवश्यकता असूनही नियुक्ती करू शकत नाहीत. उपलब्ध असलेले अनेक शिक्षकही या ना त्या कारणाने बऱ्याचदा आपल्या व्यक्तिगत अडचणीमुळे बऱ्याचदा दीर्घ रजेवर असतात.