पिंपरी : एव्हरेस्टवीर आंनद बनसोडे याने ‘वर्ल्ड पीस सेव्हन समिट’ या मोहिमेतील चौथा खंड आॅस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माउंट कोसिस्को व इतर १० सर्वोच्च शिखरे नुकतेच सर केले. तीन दिवसांच्या बनसोडे याच्या नेतृत्वाखाली भारतातील ८ जणांनी हा पराक्रम केला. आॅस्ट्रेलियातील १० सर्वोच्च शिखरे (आॅसी १०) पूर्ण करणारी हे पहिले भारतीय पथक आहे. पथकात बनसोडे याच्यासह शरद कुलकर्णी, अंजली कुलकर्णी, श्रीकांत चव्हाण, रुपाली चव्हाण, दिनेश राठोड, तारकेश्वरी भालेराव, आकाश जिंदाल, संजना दलाल, मनीषा वाघमारे, साची सोनी याचा समावेश होता. जगातील चार खंडाच्या सर्वोच्च उंचीवर राष्ट्रगीत वाजवणारा जगातील एकमेव गिर्यारोहक बनण्याचा मान बनसोडे याला मिळाला आहे. बनसोडेचे प्रशिक्षक सुरेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत मोहीम आखली होती. या मोहिमेत ३ जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता. आॅस्ट्रेलियातील कोसिस्को, टाउनसेंड, राम्सहेड, इथररिज, राम्सहेड नॉर्थ, आलिस रोव्सोन पीक, अब्बोट पीक, साउथ वेस्ट आॅफ अब्बोट पीक, कॅरुथर पीक ही १० शिखरे सर केली.
आॅस्ट्रेलिया खंडावर फडकला तिरंगा
By admin | Updated: November 10, 2014 05:17 IST