शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

फरासखाना स्फोटाचा तपास अधांतरीच

By admin | Updated: August 11, 2014 03:48 IST

फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही

पुणे : फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतरही दहशतवाद विरोधी पथकासह तपास यंत्रणांच्या हातामध्ये ठोस काहीही लागलेले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांच्या आवाक्याबाहेर असल्याचे चित्र आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्ब पेरलेली दुचाकी लावणाऱ्या दहशतवाद्यांची अगदी स्पष्ट छायाचित्रे एटीएसच्या हाती लागली आहेत. या दोघा जणांचा युद्धपातळीवर तपास सुरू असून दहा जणांकडे आतापर्यंत कसून चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला लागूनच असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी १० जुलै रोजी दुपारी २.०५ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी दादासाहेब रासगे यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच ११ एनयू ७१७४) सातारा न्यायालयाच्या आवारामधून चोरण्यात आली होती. या मोटारसायकलला डिकी बसवून, त्यात बॉम्ब पेरण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या श्री वडापाव सेंटरच्या मालकीण व कामगारांसह एकूण पाच जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला होता. एटीएस व पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यानंतर शहरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यातील बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, भाऊ महाराज बोळ, तुळशीबाग परिसर, स्वारगेट बस आगार आदी भागांतील सीसीटीव्हीत दहशतवाद्यांची छबी टिपली गेली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बॉम्ब ठेवणाऱ्या दोघा जणांची छायाचित्रे तयार करून घेतली आहेत. ही छायाचित्रे अगदी स्पष्ट असल्यामुळे त्याआधारे दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यासोबत फरासखान्यासमोरील कामगार भवनातील सीसीटीव्हीमध्ये मोटारसायकल पार्किंगमध्ये लावतानाच,े तसेच बॉम्बस्फोट होतानाचे चित्रीकरण आलेले आहे. सकाळी साधारणपणे सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी बॉम्ब पेरलेली मोटारसायकल लावली होती. बॉम्बची दिशा जमिनीच्या दिशेने असल्यामुळे, तसेच आजूबाजूला मोटारसायकली लावलेल्या असल्यामुळे बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यातील बॉल बेअरिंग, छर्रे अधिक प्रमाणात बाहेर उडू शकले नाहीत. (प्रतिनिधी)