शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावमधील गाळ्यांच्या मोजणीचा फार्सच!

By admin | Updated: December 8, 2015 00:09 IST

नारायणगाव-जुन्नर रोडवरील मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने तसेच पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने

नारायणगाव : नारायणगाव-जुन्नर रोडवरील मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने तसेच पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने तसेच नारायणगाव ग्रामपंचायतीने जागेवर आपला हक्क सांगितल्याने सोमवारी होणारी मोजणी स्थगित झाली़सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित न राहता शिपायांना पाठविल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.सकाळी १० वाजता भूमिअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी नारायणगाव-जुन्नर रोडच्या मोजणीसाठी आले असता ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष पाटे यांनी हरकत घेतली. सदरची पत्राशेडची जागा ही ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या नावे असून, मिळकत नं़ १०० वॉर्ड नं़ ३ पूर्व ते पुणे-नाशिक रोडपर्यंत १२० फूट पूर्व-पश्चिम लांबीची बखळ जागा ग्रामपंचायत नारायणगावचे नावे आहे़ सदरच्या गाळेधारकांनी खेड कोर्टात दि़ ७/११/२०१५ रोजी दावा दाखल केला असून, निरंतर मनाई ताकिदीची मागणी केलेली आहे़ या दाव्यात प्रतिवादी नं़ १ म्हणून सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत नारायणगाव व प्रतिवादी नं़ २ म्हणून उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर यांना पार्टी केलेले आहे़ सदर मिळकत व त्यातील गाळे न्यायप्रविष्ठ असल्याने मोजणी करणे योग्य राहणार नाही़, असा खुलासा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला़ तथापि दुपारनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता चौधरी हे नारायणगाव पोलीस ठाण्यात गेले व त्यांनी पोलीस बंदोबस्त मागितला़ परंतु सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी तत्काळ बंदोबस्त देण्यास असमर्थता व्यक्त केली़ पोलीस बंदोबस्तासाठी दोन दिवस अगोदर अर्ज करणे अपेक्षित होते. जेवढा बंदोबस्त हवा तेवढा नजराणा भरणे गरजेचे होते़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दि़ ५ डिसेंबर रोजीचे पत्र आहे. आपण ते आज देत आहात़ तत्काळ बंदोबस्त देणे शक्य नाही़ पोलीस ठाण्यातील कर्मचारी/अधिकारी आळंदी येथील बंदोबस्ताला गेलेले आहेत़ त्यामुळे आजच्या आज कर्मचारी/अधिकारी देता येणार नाहीत़ त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी मोजणीच्या ठिकाणी फिरकला नाही़ मोजणीसंदर्भात कार्यकारी अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मोजणी आजच होईल. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश आलेले आहेत़ त्यामुळे मोजणी होणार असे स्पष्ट केले. मात्र ती झालीच नाही. (वार्ताहर)