शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

सिद्दीकीच्या बदल्यासाठी फरासखाना स्फोट

By admin | Updated: February 21, 2016 03:09 IST

येरवडा कारागृहात झालेल्या दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सिमीच्या दहशतवाद्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट

पुणे : येरवडा कारागृहात झालेल्या दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सिमीच्या दहशतवाद्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. गुप्तचर विभागाच्या ‘इनपुट’वरून ओडिशा व तेलंगना पोलिसांनी रुरकेला येथे कारवाई करीत अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात ही माहिती उघडकीस आली. शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू ऊर्फ समीर ऊर्फ रमेश शेख इस्माईल (वय २७, रा. गणेश तलाई, खांडवा, मध्य प्रदेश), अमजद ऊर्फ दाऊद ऊर्फ पपू ऊर्फ उमर रमजान खान (वय २७, रा. चिराखादान, खांडवा, मध्य प्रदेश), मोहम्मद अस्लम ऊर्फ बिलाल, जाकीर ऊर्फ सादिक ऊर्फ विक्की डॉन ऊर्फ विनयकुमार बदरूल हुसेन (वय ३२, रा. सेल्स टॅक्स कार्यालयामागे, खांडवा, मध्य प्रदेश) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. कतिलने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तेथील पथारी धारकामुळे त्याचा हा प्रयत्न असफल झाला होता. दिल्ली पोलिसांकडून त्याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले होते. कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याने साथीदारांसह येरवडा कारागृहातील अंडा बराकमध्ये कतिल सिद्दीकीचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जंगलीमहाराज रस्त्यावर पाच साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते; मात्र दहशतवाद्यांचा हा प्रयत्न फसला होता; परंतु पुण्यातील फिरोज सय्यदसह काही दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती. फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोर घडवून आणलेल्या बाँबस्फोटा प्रकरणी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू असून, बाँबस्फोटामागील कारणे हळूहळू समोर येत आहेत. यातील आरोपींनी फरासखाना स्फोट आपणच घडविल्याची कबुली दिली असल्याने पोलीस अधिक तपास करीत आहेत.