शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या कारागृहातील शेती करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:28 IST

विवेक भुसे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे ...

विवेक भुसे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खुल्या कारागृहातील बंद्यांना शेतीचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना दररोज कुशल कामगारांचे वेतनही दिले जाते. ब्रिटीश काळापासून सुरु असलेली ही पद्धत आताच्या काळात सुसंगत नसल्याने आता खुल्या कारागृहातील शेती विभाग बंद करणार आहे. त्याचबरोबर कारागृहातील दशकानुदशके तेच ते उद्योगातून निर्मिती केली जात आहे. त्यात आता बदल करणार आहे. त्यासाठी उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.

कारागृहातील उद्योग तसेच विविध बाबींत करण्यात येणाऱ्या सुधारणाविषयी कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी लोकमत ला माहिती दिली.

कारागृहात शिक्षा झालेल्या बंदी तसेच चांगली वागणूक असणार्‍या बंदींना खुल्या कारागृहात पाठविले जाते. तेथे प्रामुख्याने त्यांच्याकडून शेतीची कामे करुन घेतली जातात. राज्यातील विविध कारागृहाकडे मोठी शेत जमीन आहे. त्यात गहू, ज्वारीपासून वेगवेगळी पिके घेतली जातात. ब्रिटीश काळापासून ही पद्धत आहे. या बंद्यांना कुशल कारागीर असे समजून वेतन दिले जाते. त्यासाठी होणारा खर्च लक्षात घेता त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे कारागृहातील शेती विभाग बंद करावा, असा प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडून राज्य शासनाला पाठविण्यात येत आहे. त्याऐवजी खुल्या कारागृहातील बंद्यांना कारागृहाजवळच खासगी उद्योगात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव आहे.

पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक रोड या कारागृहात ही योजना राबविणार आहे. खुल्या कारागृहातील या बंद्यांना सकाळी रोजगारासाठी सोडले जाईल. त्यांनी जवळच्या दुकानात, उद्योगात दिवसभर काम करावे व सायंकाळी पुन्हा बराकीत परत यावे, अशी ही योजना आहे. शासनाकडून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले.

कारागृहात सध्या अनेक पारंपारीक उद्योग चालविले जातात. त्यात त्या प्रामुख्याने टेक्सट्राईल इंडस्ट्रीवर भर दिला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हातमागाद्वारे येथे कापडाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या ७० वर्षात त्यात फारसा बदल केला नाही. सध्याच्या बाजारपेठेला अनुसरुन उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यासाठी कोणते उद्योग कालबाह्य झाले आहेत. कोणते नवीन उद्योग सुरु करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार आवश्यक ते बदल करणार आहे.

१४०० कैद्यांची क्षमता वाढीचा प्रस्ताव

राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी सध्या ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना सारख्या संसर्गात संपूर्ण कारागृहात त्याची लागण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यातील कारागृहाची क्षमता १४०० कैद्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली आहे. नवीन कारागृह स्थापनेसाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना जमीन शोधण्याचे आदेश राज्य शासनाकडून दिल्याचे सुनील रामानंद यांनी सांगितले.