शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात शेतकरी गेला वाहून

By admin | Updated: December 12, 2015 00:46 IST

नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत.

भोर : नेरे येथील धोमबलकवडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात म्हैस वाचविण्यास गेलेला शेतकरी वाहून गेला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता; मात्र ते सापडले नाहीत. रामचंद्र हरिभाऊ शिंदे (वय ६५, रा. नेरे) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. आत्तापर्यंत विविध घटनांत या कालव्यात वाहून जाऊन चार जण मरण पावले आहेत, तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.याबाबतची महिती अशी की, भोर-मांढरदेवी रोडवरील नेरे गावातून धोमबलकवडी धरणाचा कालवा जातो. आज सकाळी साडेदहा वाजता गावातील रामचंद्र शिंदे आपली जनावरे चारायला घेऊन कालव्याच्या पलीकडे जात होते. या वेळी प्राथमिक शाळेजवळच्या कालव्यात एक म्हैस पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने म्हैस पाण्यात वाहून जाईल, या भीतीने ते पाण्यात उतरले. म्हशीला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शिंदे पाण्यात वाहून गेले. म्हैस पोहुण कालव्याच्या पलीकडच्या टोकाला निघाली. ही घटना नेरे ग्रामस्थांनी धोमबलकवडी धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना सांगून कालव्याचे पाणी बंद करण्यास सांगितले; मात्र पाणी बंद न केल्याने पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शोध मोहिमेत अडचण येत होती. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. (वार्ताहर)