शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांनी पुन्हा काम पाडले बंद

By admin | Updated: November 12, 2014 23:17 IST

पोलीस फाटा दिमतीला घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका:यांना भांबोलीकराच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आंबेठाण : पोलीस फाटा दिमतीला घेऊन रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिका:यांना भांबोलीकराच्या रोषाला सामोरे जावे लागले. जोर्पयत आमचे परतावे वाटप आणि प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत, तोर्पयत रस्त्याचे काम होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा भांबोली (ता. खेड) येथील शेतक:यांनी दिला आहे.
भांबोली (ता. खेड) या गावच्या जमिनी चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु, संपादनानंतर कित्येक वर्षे लोटली, तरी 15 टक्के परतावे आणि इतर मागण्या प्रलंबित आहेत. या निषेधार्थ येथील शेतक:यांनी येथे सुरू असणारे 75 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम मागील कित्येक महिन्यांपासून अडविले आहे. आज पुन्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन काम सुरू करण्यासाठी आले. तेव्हा पुन्हा शेतकरी जमा झाले आणि त्यांनी काम बंद पाडले.
आम्हाला आमचे परतावे त्वरित मोजून दिले जावे आणि ते विभागून न देता एकाच जागी द्यावे, अशीही मागणी या वेळी शेतक:यांनी केली. शेतक:यांना 15 टक्के जमिनीचे परतावे मिळत नाहीत, घराचे अडीच गुंठे परतावे मिळत नाहीत. स्थानिक शेतक:यांच्या परताव्याला कमी फ्रंट आणि इतर शेतक:यांच्या कमी क्षेत्नाला जास्त फ्रंट, असा भेदभाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी करीत आहेत. त्या निषेधार्थ हा रास्ता रोको करीत असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले. तसेच, खातेदार म्हणून एक शेतकरी असेल आणि त्याला तीन मुले असतील, तर अशा शेतक:याला प्रत्येक मुलामागे एक, असा घराचा परतावा मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतक:यांनी या वेळी केली.
या प्रसंगी नंदू निखाडे, दशरथ राऊत, सदाशिव राऊत, मुरलीधर राऊत, यमुनाबाई राऊत, नारायण राऊत, सहदेव लांडगे, सरस्वती राऊत, फासाबाई लांडगे, एकनाथ राऊत, सुमन राऊत, दत्तात्नय लांडगे, रामदास राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 
पोलीस म्हणतात, की या वेळी पोलिसांनी शेतक:यांना कायद्याचा धाक दाखवीत आत टाकण्याची धमकी दिली आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून आत टाकण्याची धमकी दिली.
 
शेतक:यांना पूर्वी परतावे वाटप केले आहेत. याची पुन्हा मोजणी करून हवी असेल, तर त्यांनी तसे अर्ज करावे. त्यांना पुन्हा परतावे मोजून दिले जातील.
-विनय क्षेमकल्याणी, सर्वेअर,एमआयडीसी
 
गरीब शेतक:याला कुठेतरी ओढय़ाला परतावा दिला जात असून, गुंतवणूकदारांना मात्न मोक्याच्या ठिकाणी आणि सपाट जमीन पाहून परतावा दिला जात आहे. गरीब शेतक:याला ओढय़ासारख्या ठिकाणी परतावा दिला जात असल्याने त्याची अडचण होत आहे. त्याला जमीन सपाट करणो आणि आदी कामांसाठी प्रचंड वेळ आणि पैसा खर्च करावा लागत आहे. चार पैसे घेऊन अधिकारी चुकीचे काम करत असल्याने त्याचा परिणाम शेतक:यांना भोगावा लागत आहे, असाही आरोप संतप्त शेतक:यांनी केला.
 
चाकण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे आणि त्याचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता डी. डी. पांगारे, उपअभियंता अजय महिंद्रकर, सहायक अभियंता एस. एम. कवडगी, सर्वेअर विनय क्षेमकल्याणी उपस्थित होते. अखेर, उपस्थित अधिका:यांच्या विनंतीला मान देत शेतक:यांनी दोन दिवसांत परतावे मोजून देण्याच्या अटीवर रस्त्याचे काम सुरू करण्यास मान्यता दिली.