शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कडधेत शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: November 30, 2015 01:46 IST

कडधे, ता. मावळ येथील शेतकरी दगडू हरीभाऊ भोकरे (वय ६८, रा. कडधे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी जमिनीमध्ये फसवणूक झाल्यामुळे व कसत असलेल्या

कामशेत : कडधे, ता. मावळ येथील शेतकरी दगडू हरीभाऊ भोकरे (वय ६८, रा. कडधे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी जमिनीमध्ये फसवणूक झाल्यामुळे व कसत असलेल्या जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी धमकावण्यात आल्याने राहत्या घरासमोरील शेतातील झाडाच्या फांदीला दोरी बांधूून शनिवारी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा लहू दगडू भोकरे (वय २९, रा.कडधे ता.मावळ) यांनी तिघांविरोधात कामशेत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू भोकरे यांची कडधे येथे गट नं.१३३,१२८,१२४ या मिळकती वडिलोपार्जित असून, त्यांचाच ताबा आहे. भोकरे यांचे आजोबा हरीभाऊ वाघू भोकरे यांनी गट नं.११३,१२८,,१२४ हे तीन गट चंद्रकांत रघुनाथ आगीने (रा. कडधे) यांना दिली असून, त्या बदल्यात वरील मिळकती या आगीने यांनी गट नं. ९६ क्षेत्र ५१ आर,व गट नं.२०६ क्षेत्र १४ एकर ही मिळकत भोकरे यांना दिली होती.परंतु आगीने यांनी भोकरे यांची जमीन कागदोपत्री त्यांच्या नावे करून घेतली. स्वत:च्या मिळकती स्वत:च्याच नावे ठेवल्या. तीन गटाच्या ताब्यासाठी दि.२७ रोजी सकाळी ८.३० चे सुमारास फिर्यादी व त्यांची बहीण घरी असताना बाळू नथू पारखी (रा. ओझर्डे) हा त्याच्या एका मित्राला घेऊन भोकरे यांच्या घरासमोर आला व तुमचे ताब्यातील गट नं.११३,१२८,१२४ ही जमीन प्रसाद श्रीकांत टापरे व त्याची बहीण जुई मेडेकर (रा. रविवार पेठ, पुणे) यांचेकडून खरेदी केली आहे. त्या जमिनीचा ताबा तुम्ही सोडा, नाही तर तुमच्याकडे बघून घेईन, अशी धमकी दिली. फिर्यादीचे वडील घरात आल्यानंतर पारखींनी त्यांनाही दमदाटी केली. पुन्हा रात्री ९.३० ला पारखी धमकावून गेला. (वार्ताहर)