शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: March 5, 2016 00:42 IST

कोये-पाईट नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विमानतळाला पाईट परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत विमानाची प्रतिकृती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

पाईट : कोये-पाईट नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या विमानतळाला पाईट परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत विमानाची प्रतिकृती जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेसंदर्भामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी चार जागांपैकी एका जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यातही सर्व गोष्टींचा विचार करून खेड तालुक्यातील कोये, पाईट येथील जागेस हिरवा कंदील मिळाल्याचे सूचकपणे जाहीर केल्यावर, आज पापळवाडी येथील गणेश मंदिराजवळ परिसरातील शेतकरी जमले. या ठिकाणी होऊ घातलेल्या विमानतळास विरोध दर्शवत विमानाच्या प्रतिकृतीचे दहन करीत निषेध केला. या वेळी जमलेल्या तरुणांनी घोषणाबाजी करीत विमानतळासाठी जागा देणार नसल्याचा सूर काढत निषेध केला.या वेळी बोलताना पोपट राळे यांनी शासनाने विमानतळ जागेसंदर्भामध्ये शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती ठेवून विमानतळ या परिसरात करण्याचा डाव हाणून पाडू, असे सांगितले. तर पापळवाडी येथील शेतकरी भानुदास दरेकर यांनी या परिसरातील शेतकरी, भामा आसखेडमध्ये बाधित झालेला असताना, दुसऱ्यांदा त्यांची जागा संपादित करणे अन्यायाचे होईल, असे सांगितले. या वेळी परिसरातील पोपट राळे, विलास दरेकर, भानुदास दरेकर, चंद्रकांत कोळेकर, आनंदा चोरघे, कालिदास राळे, मल्हारी लोंढे, अर्जुन डांगले, भरत दरेकर, विशाल डांगले, चांगदेव पापळ, वनाजी पापळ आदी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.