शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सशक्तीकरण गरजेचे

By admin | Updated: October 1, 2015 01:08 IST

शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे,

पुणे : शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले आहे. त्यातून निराश झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. अशा वेळी त्यांचे मानसिक सशक्तीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्माकुमारी नलिनी दीदी यांनी व्यक्त केले.प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे ‘अखिल भारतीय किसान सशक्तीकरण अभियान’ या कार्यक्रमाचे आयोजन धायरी गाव येथे करण्यात आले होते. त्या वेळी नलिनी दीदी बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, ब्रह्माकुमार दशरथ भाई, सरपंच नितीन दुधाने, अंकुश बगाटे, नांदेड सिटीचे संचालक प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.नलिनी दीदी म्हणाल्या, की आज मॅन पॉवर, मनी पॉवर मटेरियल पॉवर आहे. पण त्याचबरोबर मेंटल पॉवरची आवश्यक आहे. तिचे बीजारोपण यौगीक शेतीच्या कार्यामध्ये केल्याने भारतभूमी सुजलाम सुफलाम होईल.दशरथ भाई म्हणाले, की या अभियानाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंंग यांच्या हस्ते दिल्ली येथे झाले असून, संपूर्ण देशभरात १३० अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, यौगीक शेती यावर मार्गदर्शन करणार आहे. हे अभियान पुणे ते जेजुरी असे असून, यामध्ये पुणे, सातारा, वाई-फलटण अशी १२१ गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार असून, ते २ नोव्हेंबरला जेजुरीला समाप्त होणार आहे. या वेळी विनयकुमार आवटे, डॉ. रजपूत, नवनाथ कोळपकर, नितीन दुधाने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमारी सुलभा बहन यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)