शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घामाचा दाम न मिळाल्याने शेतकऱ्यांचा मंदिरातच ठिय्या!

By admin | Updated: March 4, 2016 00:39 IST

साईकृपा साखर कारखान्याकडून १८ महिने होऊनही थकीत एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने अखेर शिंदोडी (ता. शिरूर) येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी बायका-मुलांसह येथील मंदिरात ठिय्या मारत

निमोणे : साईकृपा साखर कारखान्याकडून १८ महिने होऊनही थकीत एफआरपीची रक्कम मिळत नसल्याने अखेर शिंदोडी (ता. शिरूर) येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी बायका-मुलांसह येथील मंदिरात ठिय्या मारत आंदोलनास सुरुवात केली आहे. २०१४-१५ या गळीत हंगामातील साईकृपा शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रिज लि. हिरडगाव (ता. श्रीगोंदा) या कारखान्याकडून एफआरपी देणे बाकी आहे. हा खासगी साखर कारखाना माजी मंत्री बबनराव पाचपुते व विक्रमसिंह पाचपुते यांचा आहे. ऊस दिल्यानंतर एफआरपी प्रमाणे १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक असताना १८ माहिने उलटूनही हातात पैसे पडलेले नाहीत. हे सर्व ऊस उत्पादक शेतकरी सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. हे शेतकरी गेली वर्षभरापासून पाचपुते यांना आतापर्यंत २५ ते ३० वेळा समक्ष भेटून बिलासंदर्भात विचारणा करीत आहेत. परंतु काही शेतकऱ्यांना अल्पसेच बिल देऊन त्यांची बोळवण केली आहे. उर्वरित पैशांसाठी वेळोवेळी वायदे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.एकट्या शिंदोडी गावातील ३० गरीब शेतकऱ्यांचे सुमारे ७०-८० लाख रुपये येणे बाकी आहे. तालुक्यातील अन्य काही गावांतील शेतकरीही असेच फसवले गेले आहेत. वेळोवेळी मागणी करून घामाचे दाम मिळत नसल्याने आतापर्यंत संयम बाळगलेला शेतकरी आक्रमक झाला आहे. या उसाचे पैसे आणि त्यावर १८ % दराने व्याज मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आंदोलनामध्ये शिवसेना शाखाप्रमुख योगेश ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ फडके, सहकारी संस्थेचे संचालक बाळासाहेब धावडे, पांडुरंग फडके, दत्तात्रय फडके, वैभव ओव्हाळ, संतोष टाकळकर, सुमन वाळुंज, परमेश्वर इंगोले आदी ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले असून, पैसे मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा त्यांनी निर्धार केला आहे. (वार्ताहर)