शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली शेतकरी कंपनीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

भागातील शेतकरी होणार उद्योजक १७० शेतकऱ्यांनी स्थापन केली शेतकरी कंपनी; तेलबिया प्रक्रिया उद्योगाची उभारणी (रविकिरण सासवडे) बारामती : गुणवत्तापूर्ण ...

भागातील शेतकरी होणार उद्योजक

१७० शेतकऱ्यांनी स्थापन केली शेतकरी कंपनी;

तेलबिया प्रक्रिया उद्योगाची उभारणी

(रविकिरण सासवडे)

बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे कौशल्य आपण शिकले पाहिजे. याच जाणिवेतून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून गळीत धान्याच्या उत्पादनातून खाद्यतेल प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. तर, पुढील काळात या कंपनीच्या माध्यमातून ५०पेक्षा जास्त घरगुती तेलघाणे उभारून सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवण्यासाठी कृषी विभागाने विडा उचलला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिरायती भागातील शेतीउत्पादन कायम अडचणीत येत असते. येथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी उद्योजक होण्यापूर्वी कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जिरायती भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी, चारा पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतात. यामध्ये आंतरपीक म्हणून करडई, भुईमूग, आदी पिकांचा अंतर्भाव केला जात असे. कृषी विभागाने मागील दोन हंगाम तेल बियांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. केवळ तीन ते चार महिन्यांत शेतकरी उत्पादन घेऊन सक्षम होऊ लागला होता. कंपनीने सध्या दोन तेल घाणे राजकोट येथून खरेदी केले आहेत. शेतकरी गटांना सामावून घेत, परिसरात तेल बियांचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सध्या आमच्या शेतकरी कंपनीशी १७० शेतकरी जोडले गेले आहेत. यंदा आम्ही १०० एकर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. सध्या भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. तर खरिपात ५० एकर करडई, १०० एकर सूर्यफुलाची पेरणी करण्यात येणार आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या भूईमुगापासून कमी प्रमाणात तेलाची रिकव्हरी मिळत होती. त्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हैदराबाद कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला यंदा आयसीजीबी ३०४३ या वाणाचे भूईमुगाचे बियाणे मिळाले आहे. शेतकरी स्वत:च्या शेतातील तेलबियांचे तेल काढून विकत असल्याने आमच्याकडे मागणी देखील मोठ्याप्रमाणावर आहे.

- सुनील जगताप

संचालक

ॲग्रो स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारामती

---------------------------------

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात यशस्विपणे उतरणे गरजेचे आहे. जिरायती भागात तेल बियांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारल्याने इतरांसाठी ते प्रेरणादाई आहेत.

- दत्तात्रय पडवळ

तालुका कृषी अधिकारी, बारामती

----------------------------

बारामती तालुक्यातील तेल बिया

उत्पादनाची आकडेवारी( हेक्टरमध्ये )

तेलबिया २०१९-२० - २०२०-२१

सोयाबिन - ३१८.६० - १५४२.९०

सूर्यफूल - ३२.४० - ८२.८०

भुईमूग - ४३.१० - ७१५.६०

करडई - १५ - ३६.६०

------------------------------

फोटो ओळी : बारामती येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी अंतर्गत सध्या तेल गाळपासाठी उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.

३००६२०२१-बारामती-१४

---------------------------------