शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्यांना मारहाण

By admin | Updated: March 30, 2017 00:14 IST

खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील

देऊळगावराजे : खोरवडी (ता. दौंड) येथील बंधाऱ्यांवर वडगावदरेकर (ता. दौंड) आणि कौठा (ता. श्रीगोंदा) या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी हाणामारी झाली. या वेळी वडगावदरेकरच्या ग्रामस्थांना मारहाण झाली. संतप्त वडगावदरेकरच्या शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकले. एकंदरीतच तालुक्याच्या पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ््याच्या तोंडावर पेटला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात नेमकी काय परिस्थिती राहील, याबाबत शेतकरी धास्तावला आहे. वडगावदरेकर येथील बंधाऱ्यात पाणी पोहोचले नसल्याने येथील शेतकरी खोरवडीच्या बंधाऱ्यावर ढापे टाकून पाणी अडवले की काय, हे पाहण्यासाठी गेले होते. जर पाणी अडवले असेल तर ते पाणी वडगावदरेकरपर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रत्यक्षात मात्र ढापे टाकलेले होते. काही शेतकरी ढापे काढायला लागले. कौठा (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्यांनी ढापे काढण्यासाठी विरोध केला. वडगावदरेकर येथील शेतकऱ्यांना कौठा येथील शेतकऱ्यांनी मारहाण केली.वडगावदरेकर येथील संतप्त शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी दौंड पाटबंधारे कार्यालयात गेले होते, मात्र पाटबंधारे कार्यालयात कोणीच निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. परिणामी वडगावदरेकर येथील शेतकरी अधिक संतप्त झाले. शेतकऱ्यांनी पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तहसीलदार विवेक साळुंके यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिले. साळुंके यांनी पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला ठोकलेले टाळे काढून घेतले. पाटबंधारे कार्यालयाचे ढिसाळ नियोजनदौंड तालुक्याच्या पूर्व भागात पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी पोहोचू शकले नाही. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी सोडण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून ‘टेल टू हेड’ या पद्धतीने बंधारे भरायला हवे होते, परंतु तसे न करता पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्याने दौंड पश्चिमेकडील बंधारे भरल्याने पाणी दौंडच्या पूर्व भागापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. भामा-आसखेडचे पाणी भीमा नदी चालू होते तोपर्यंत पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन करून पाणी दौंड तालुक्यातील खानवटे गावापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते, परंतु पाणी बंद झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी माऊली कापसे, पोपट वाघमारे, राजू वाघमारे, शहाजी वाघमारे, मनोहर पहाणे, संभाजी वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.