शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे शेतजमिनी होताहेत नापीक

By admin | Updated: April 24, 2017 04:39 IST

चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चासकमान : चाचकमानच्या पाणीवटपावरून सध्या मोठे वाद होत आहेत. त्यात धरणात पाणी अत्यल्प राहिल्याने पाणलोटक्षेत्रात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असताना मात्र कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातील पाणी गळतीमुळे मध्येच जिरत आहे. नको असताना शेतात पाणी जिरत असल्याने येथील शेत नापीक होत आहे. यामुळे ही गळती कधी थांबनार असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे ठिकठिकाणी गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शेतात झिरपत असल्याने जमिनी नापीक होत आहेत. धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्याने धरणांतर्गत असलेल्या डेहणे, वाडा, दरकवाडी, बुरसेवाडी, तिफनवाडी परिसरातील पाणीपातळीत घट होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डाव्या कालव्याचे अस्तरीकरण न झाल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गळती होणाऱ्या पाण्याला कोणी वाली आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.या धरणातील पाण्याचा फायदा खेड व शिरूर तालुक्याला झाला. परंतु गेले ४० वर्षे उलटूनही चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याचे अपूर्ण काम तसेच अस्तरीकरण झालेले नाही. पश्चिम भागातील कमान, चास, आखरवाडी, तिन्हेवाडीदरम्यान तसेच पूर्व भागातील भांबुरवाडी भागात गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती असतानाही परिसरात ओढे, नाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून पाणी वाहताना दिसत आहे. कालव्याच्या गळतीमुळे दरवर्षी ३० ते ४० टक्के पाणी वापराविना वाया जात असते. त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले तरी शिरुर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहत असते. यामुळे कालव्याचे लवकरात लवकर अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. (वार्ताहर)