शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर ते द्राक्षबागायतदार यशस्वी वाटचाल

By admin | Updated: December 26, 2016 02:12 IST

इंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या

अजय नागवे / काझडइंदापूर तालुक्यातील द्राक्षाचे आगार म्हणून बोरी गावाची ओळख आहे. मागील १० ते १५ वर्षांपूर्वी पाण्यासाठी दाहीदिशा असणाऱ्या या गावाचा शेततळ्यांच्या माध्यमातून आता कायापालट झाला आहे. शेतमजूर ते द्राक्षबागायतदार असा प्रेरणादायी प्रवास बोरीच्या शेतकऱ्यांचा आहे. तब्बल १५० शेततळी आहेत. या १५० शेततळ्यांत लाखो लिटर पाणी साठवले जात आहे. त्यामुळे दुष्काळातही येथील शेती हिरवीगार दिसते.गावाची लोकसंख्या ६ हजारापर्र्यंत आहे. शेततळ्यात साठवलेल्या पाण्यामुळे गाव हिरवेगार आहे. १९७१-७२च्या काळात बोरी गावाला मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत तसेच २००४च्या काळत भीषण दुष्काळ पडला होता. या वेळी थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या द्राक्षबागा पाणी नसल्यान तोडून टाकाव्या लागल्या आणि त्या वेळी गावातील बागायतदारांना आसपासच्या गावांमध्ये मजुरीसाठी जावे लागले. यानंतर मात्र गावातील प्रत्येक शेतकऱ्याने पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा चंगच बांधला. येथील शेतकऱ्यांच्या प्रयत्नातूनच बोरीच्या माळरानावर आज नंदनवन फुलले आहे. गावात बांधण्यात आलेल्या शेततळ्याचा वापर उन्हाळ्यात केला जातो. उन्हाळ्यात वापरलेल्या पाण्याचा साठा खालावला, की शेततळे पुन्हा भरण्यासाठी पावसाळ्यात विहिरी पाण्याने पूर्ण क्षमतेने भरून ठेवतात. शेततळ्यातले पाणी द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. त्यामळे त्या पाण्याचीसुध्दा बचत होते. ज्या माळरानावर हुलगा, मटकी पिकत होते, तिथे आता फळबागा पिकत आहेत.पहिल्यांदा विरोध; नंतर अनुकरण... बोरी गावातील रामचंद्र शिंदे यांनी प्रथम बोरीमध्ये शेततळे उभारले. या वेळी त्यांना शेततळे न बांधण्याचा सल्ला अनेकांनी दिला. परंतु शिंदे यांनी शेततळे उभारून त्याचा वापरही शेतकऱ्यांना करून दाखवला. तसेच पाणीटंचाईच्या काळात याच शेततळ्याने त्यांच्या द्राक्षबागेला आधार दिला. यावर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडून शेततळ्याची माहिती घेतली. येथूनच शेततळ्याची क्रांती होत गेली.