शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: May 6, 2017 01:53 IST

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कभुलेश्वर : पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनविण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा लाभ पाईपलाईनद्वारे अनेक शेतकरी घेत आहेत. हा लाभ फक्त जवळील शेतकऱ्यांनाच होत आहे. या योजनेपासून लांब असलेल्या गावांतील शेतकऱ्यांचीही या योजनेतून पाणी मिळविण्यासाठी धडपड सुरू असून, लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे शेतापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.पुरंदर तालुक्याला दुष्काळी स्थितीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरली आहे. तशी ही योजना कमी पाण्यावर जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून ठिबक सिंचन पद्धतीने तयार करण्यात आली. पाईपलाईनद्वारे दोन्हीकडील क्षेत्र पाण्याने भिजावे म्हणून या योजनेची पाईपलाईन डोंगराच्या कडेला न टाकता डोंगररांगांपासून काही अंतर सोडून करण्यात आली. कोणतीही पाणी सोसायटी न करता पाणी सोडून तळी, बंधारे भरण्यात येत आहेत. उताराकडील जमिनींना या योजनेचे पाणी सहज मिळते; मात्र डोंगररांगांच्या जवळील जमिनी आजही या पाण्यापासून वंचित आहेत.पुण्यातील रोजचे वापरात येणारे पाणी मुळा-मुठा नदीद्वारे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. पुण्याची लोकसंख्या पाहता हे पाणी उन्हाळ्यातही मुबलक प्रमाणात मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यात शिंदवणे घाट चढून तालुक्यात येते. घाटुळीआई देवीनजीक योजनेचे पाणी डोंगराशेजारी सोडण्यात येते. पिसर्वे गावानजीक योजनेची पहली ठिबक सिंचनाची सोसायटी करण्यात आली; मात्र तांत्रिक बाबीमुळे ती सुरू होऊ शकली नाही. यामुळे उर्वरित कामे पुरी न होता ही योजना आजतागायत पहिल्यासारखीच सुरू आहे. म्हणून प्रत्येक गावातील काही भागाला पाणी मिळाले, तर काही भाग या योजनेपासून वंचित राहिला. यामुळे या योजनेत ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली.आपल्यालाही पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी योजनेच्या लाईनपासून दोन-तीन किलोमीटरवर असणारे नाले, तळी भरण्यासाठी सध्या शेतकरी एकत्र आले आहेत. स्वत: लोकवर्गणी करून बारा-पंधरा लाखांच्या पाईपलाईन करून मातीबांध भरत आहेत. यासाठी योजनेचे अधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. यामुळे योजनेपासून दूर आसणाऱ्यांनाही सध्या पाणी मिळत आहे. स्वत: पाईपलाईनचा खर्च करून पाणी मिळत असल्याने दूरवरचे शेतकरीही सुखावले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: पैसे योजनेच्या लाईनपासून ज्या ठिकाणी योजना पोहोचली नाही, तेथे नेले आहे. पुरंदर उपसा योजनेमुळे येथील शेतकरी सधन झाला असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून विविध पिके घेत आहेत. यामुळे उसाची पिकेही घेऊ लागला आहे. योजनेला शाखा अभियंता नाहीपुरंदर उपसा जलसिंचन योजना जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून या योजनेचे शाखा अभियंता म्हणून साहेबराव भोसले काम पाहत होते. त्यामुळे त्यांना या योजनेची अचूक माहिती असल्याने समसमान पाणीवाटप करताना अडचणी येत नाहीत. मात्र, सध्या साहेबराव भोसले सेवानिवृत्त झाल्याने या योजनेला शाखाअभियंता नाही. यामुळे या ठिकाणी अनुभवी शाखा अभियंत्याची गरज आहे. पाण्याची कमतरता याचा मेळ बसवताना या योजनेच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, हे नक्कीच.पुरंदर उपसा योजनेच्या लाईनपासून अनेक शेतकऱ्यांनी पाणी योजना केल्या आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यातील बराचसा भाग आज ओलिताखाली आला आहे. एकंदरीत, अनेक शेतकऱ्यांचा यात सहभाग असल्याने आज ही योजना व्यवस्थित सुरू आहे. योजनेच्या सुरुवातीपासून अनेक शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसे भरून ही योजना सुरळीत चालण्यासाठी सहकार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर ही योजना सुरू राहिली आहे, त्यांनाही वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे. या योजनेच्या पाईपलाईनजवळील शेतकऱ्यांना मिळणारे पाणी व स्वत: लाखो रुपये खर्चून दूरवरच्या शेतकऱ्यांना मिळणारे पाणी यामुळे पुरंदर तालुक्यातील लाभार्थी भागात पाण्याची पातळी नक्कीच वाढली आहे.