शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा हमीभाव म्हणजे निव्वळ धूळफेक : घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:25 IST

सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे.

सोमेश्वरनगर - सरकारने जाहीर केलेला हमीभाव ही धूळफेक असून, त्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे शोषण थांबणार नाही. निर्यातीच्या बाबतीत आपले धोरण धरसोडीचे आहे. त्यामुळे निर्यातीबाबत आपली आतंरराष्ट्रीय विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली.भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे जिल्हा शाखा सोमेश्वरनगर यांच्यावतीने ६९ व्या ज्ञान विज्ञान गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आघारकर कृषी अनुसंधान संस्थेचे संचालक अजित चव्हाण होते. पाहुण्यांनी उपस्थित श्रोत्यांशी ‘जागतिकीकरणानंतरची शेती’ या विषयावर संवाद साधला. यावेळी घनवट बोलत होते.घनवट म्हणाले, की सत्तेवर येणारे प्रत्येक सरकार शेती तोट्यात कशी राहील, अशीच धोरणे आहेत. शेतकरी कर्जबाजारी राहील, यासाठीच प्रयत्न केले आहेत. शेतकºयाला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत. शेतीचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. देशात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असताना इतर देशांतून अन्नधान्य आयात केले जाते. त्यामुळे शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.शेतकºयाला व्यापार करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. गोवंशबंदी कायद्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले आहे. हा कायदा शेतकरीविरोधी आहे, म्हणून जागतिकीकरणाचे लाभ शेतकºयाला मिळालेच पाहिजेत. शेतकरी मतदान करताना जात बघतो, म्हणूनच त्याचे प्रश्न कायम आहेत. म्हणून शेतकºयांना प्रश्न सोडवायचे असतील तर जात, धर्म पाहू नये, असे घनवट म्हणाले.धनाजी धुमाळ, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, मदन काकडे, अजहर नदाफ, समीक्षा मिलिंद, सविता पडवळ, प्राजक्ता पवार, अजय दरेकर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल दत्तात्रय अलगूर व आदिवासी प्रवर्गातून इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. गोरख काळे यांचा आणि माजी सैनिकांसाठी उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपातळीवरील पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राहुल खरात यांनी सूत्रसंचालन केले. आकाश सावळकर यांनी आभार मानले.

टॅग्स :agricultureशेतीnewsबातम्या