शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनिअर वकिलांच्या पाठीशी आता फॅमिली कोर्ट असोसिएशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 19:47 IST

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संपूर्ण देशातील न्यायालये सध्या बंद आहेत. यात पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्‍टीस असलेल्या ज्युनिअर वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे दोन महिन्याचे अन्नधान्य आणि किराणा देणार  आपतकालीन परिस्थितीत वकिलांसाठी 15 कोटींच्या तरतुदीची मागणी

पुणे : फॅमिली कोर्टात काम करणाऱ्या 50 ज्युनिअर वकिलांना मदतीचा हात देण्यासाठी द फॅमिली कोर्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. यात असोसिएशनच्या वतीने दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष वैशाली चांदणे यांनी दिली. यापूर्वी त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर वकिलाला दरमहा सात हजार रुपये मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संपूर्ण देशातील न्यायालये सध्या बंद आहेत. यात पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्‍टीस असलेल्या ज्युनिअर वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मूळातच सुरूवातील त्यांना काम कमी असते. सिनिअर वकिलांकडून त्यांना मदत मिळत असते. मात्र, सध्या न्यायालये बंद असल्यामुळे त्यांना गुजराण करणे अवघड बनले आहे. राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने वकिलांना तीन महिने स्टायपेंड देण्याची मागणी केली आहे. पुणे बार असोसिएशनकडूनही मदत करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर कौटुंबिक न्यायालय येथे प्रॅक्‍टीस करणाऱ्या ज्युनिअर वकिलांना दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनकडून मदत देण्यात येणार आहे. याविषयी अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालयातील सुमारे 50 जणांना ही मदत करण्यात येणार असून, त्यापैकी 25 जणांशी संपर्क झाला आहे. ते 6 एप्रिल रोजी कौटुंबिक न्यायालयात येणार असून, त्यावेळी त्यांना मदत देण्यात येणार आहे. जे त्या दिवशी येऊ शकणार नाहीत, त्यांनी 10 एप्रिल रोजी यावे. जे येऊच शकत नाहीत, त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल, याचाही निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. या आपतकालीन परिस्थितीत राज्य सरकारने वकिलांसाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :advocateवकिलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या