शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेनडेड तरुणाचे अवयव दान; कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 23:00 IST

आपलं दु:ख बाजूला सारुन कुटुंबाचा मोठा निर्णय

विमाननगर - आजीकडे जात असताना अचानक बुलेट घसरून तो कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा "ब्रेनडेड" झाला. अशा परिस्थितीत त्याचे इतर अवयव हे एखाद्या गरजू रूग्णाचा  जीव वाचवू शकतात याची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्यांनीदेखील आपला तरूण मुलगा गेला आहे याचे दुःख पचवत त्याचे पाच अवयव दान केले. विश्रांतवाडी येथील भीमनगर येथे राहणाऱ्या मयूर शहाजी मातंग (वय 23) याचा 15 सप्टेंबर रोजी कॉमर्स झोन चौकात बुलेट घसरून अपघात झाला. भीमनगर येथून मेंटल कॉर्नर येथे आजीच्या घरी जात असताना हा गंभीर अपघात झाला. येरवडा पोलिसांनी अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. रूग्णालयात दाखल केल्यावर त्याला मेंदूला जबर मार लागल्याने तो ब्रेनडेड झाला होता. मात्र त्याचे इतर अवयव हे गरजू रूग्णांसाठी उपयोगाचे होते. नगररोड येथील सह्याद्री रूग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या पालकांना अवयवदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. अवयवदानानंतर आपला मुलगा एखाद्याला जीवदान देऊ शकतो, हे समजल्यानंतर त्याच्या पालकांच्या संमतीने त्याचे हदय, यकृत, स्वादुपिंड व दोन किडण्या असे पाच अवयव दान करण्यात आले. विशेष म्हणजे मयूरचे कुटुंब अतिशय गरीब आहे. तो आई, वडील व तीन भावडांसह भीमनगर येथे वास्तव्यास होता. मजुरी करून जीवनाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सर्वसामान्य कुटुंबाने आपल्या तरूण मुलाचे अवयव दान करून एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या बाबत सह्याद्री रूग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. सचिन महाजन म्हणाले, मयूर मातंग या तरूण अपघातात डोक्याला गंभीर दुखापतीमुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांच्या मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे तो ब्रेनडेड झाला होता. अशा परिस्थितीत रूग्णाचा मेंदू पूर्णपणे निकामी (मृत) झाला होता. मात्र त्याच्या शरीरातील इतर अवयव हे सुस्थितीत व इतर गरजूंना रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरणार होते. सह्याद्री रूग्णालयातील डॉक्टर व समुपदेशकांनी अवयवदानाचे महत्व पटवून दिल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्याचे पाच अवयव दान करण्यात आले. या दुर्दैवी अपघातात मयूर जरी गेला असला तरी "तो" त्याने दान केलेल्या अवयवांच्या माध्यमातून जिवंतच राहणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबियांने तरूण मुलाचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श दिला आहे. 

टॅग्स :Organ donationअवयव दान