शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशाच्या बहाण्याने फसवणारे गजाआड

By admin | Updated: December 24, 2016 00:48 IST

मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने गुजरातमधील व्यावसायिकाला साडेदहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी

पुणे : मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने गुजरातमधील व्यावसायिकाला साडेदहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार कात्रज परिसरामध्ये घडला.नरेंद्र बच्चुभाई विरडीया (वय ५४, रा. पंचवटी सोसायटी, धनकवडी) आणि दीपक कुमार चोबे (वय ४७, रा. अंधेरी इस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनोद पटोलिया (वय ४६, रा. राजकोट) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटोलिया हे गुजरातमध्ये व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. पटोलिया यांचा नातेवाईक असलेल्या नरेंद्र याने हा प्रवेश मिळू शकतो असे सांगत काही एजंटशी संपक साधून दिला. त्यांच्याकडून विरडीया व इतर आरोपींनी साडेदहा लाख रुपये घेतले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला नाही. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी पैसे परत देण्याची मागणी केली असता आरोपींनी त्यांना केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेली. शेवटी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विरडीया व चोबे यांना अटक केली आहे.उपनिरीक्षक व्ही. बी. जगताप पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)