शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना दिली जाते खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:46 IST

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

दीपक जाधव,  पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एप्रिलच्या मुख्यसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत लेखी प्रश्नोत्तरामध्ये नगरसेवकांना खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या चुकीच्या उत्तरांमुळे नगरसेवकांची दिशाभूल होऊन क्षेत्रसभा रखडली जाण्याची भीती आहे. क्षेत्रसभेबाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असताना तसे काही झाले नसल्याचे उत्तर देण्यात आले.राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे क्षेत्रसभा रखडल्या असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले. नागरिकांना त्यांचे प्रश्न मांडता याव्यात याकरिता ‘लोकमत’कडून क्षेत्रसभेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल मुख्यसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत नगरसेविका विजया वाडकर यांनी क्षेत्रसभेबाबत प्रश्न विचारले होते. क्षेत्रसभा घेण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत का, त्यासाठी अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला आहे, प्रभागातील दोन नगरसेवकांपैकी क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोण असणार, अशी माहिती त्यांनी विचारली होती. मात्र, या सर्व प्रश्नांना परिमंडळच्या एकच्या उपायुक्तांनी सरळ नाही म्हणून लेखी उत्तर दिले. महापालिका अधिनियमाच्या सुधारित कायद्यानुसार नगरसेवकांनी दोन वर्षांतून किमान ४ क्षेत्रसभा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, क्षेत्रसभा घेण्याबाबत उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींवर महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागितला आहे. मात्र, ७ महिने उलटले, तरी शासनाने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. स्मरणपत्र पाठवूनही त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. विभागीय कार्यालयांना या कार्यवाहीची माहिती नसल्याचे त्यांनी नगरसेवकांना दिलेल्या चुकीच्या उत्तरातून समोर आले आहे. पालिकेच्या नियमावलीत प्रश्नोत्तरांना खूप महत्त्व आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे आयुक्तांच्या वतीने दिलेले असते. त्यासाठी एका समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तरीही नगरसेवकांना चुकीचे उत्तर देण्याचा प्रकार घडला आहे. नागरिकांना रस्ते, पाणी, साफ-सफाई, ड्रेनेज, दिवाबत्ती, कचऱ्याची विल्हेवाट आदी मूलभूत सोई सुविधांबाबत तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता क्षेत्रसभेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेण्यापूर्वी पहिल्यांदा प्रत्येक प्रभागातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघाचे एक क्षेत्र निश्चित करून ते राजपत्रातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे त्या क्षेत्रसभेचा अध्यक्ष कोणता नगरसेवक असेल, हेही ठरवून द्यावे लागणार आहे. मात्र, त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबवावी, याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट नाही, त्यामुळे राज्याकडे अभिप्राय मागविला आहे.