शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

चित्रीकरण अर्धवट बंद करण्याची नामुष्की

By admin | Updated: July 2, 2017 02:33 IST

खडकीच्या रेंजहिल्स भागात शुक्रवारी चित्रपट अभिनेत्री तब्बूच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. रहदारीच्या भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्व परवानगी न घेता

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : खडकीच्या रेंजहिल्स भागात शुक्रवारी चित्रपट अभिनेत्री तब्बूच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. रहदारीच्या भागात कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्व परवानगी न घेता चित्रीकरण सुरू केल्याने कॅन्टोन्मेट बोर्डाने आक्षेप घेतला. त्यामुळे चित्रीकरण थांबवावे लागले. या भागात सुमारे तीन तास वाहतूक खोळंबा झाला.चित्रपट अभिनेत्री तब्बू हिच्या ‘पियानो प्लेअर’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण खडकीच्या रेंजहिल्स भागात सुरू होते. सकाळी सहा वाजता खडकी रेल्वे स्थानकाजवळ चित्रीकरणाची तयारी सुरू झाली. तब्बू, राधिका आपटे आणि आयुष्मान खुराणा यांचा चित्रीकरणात सहभाग होता. चित्रीकरणासाठी अंडरपासमार्गे वाहतूक बंद करण्यात आली. सकाळची कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्यामुळे या मार्गावर वर्दळ वाढू लागली होती. बघ्यांचीही गर्दी झाली होती. वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालकांना वेळेत कार्यालय गाठण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. मात्र, पर्यायी मार्गावरही वर्दळ वाढल्याने नागरिक आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्रास होत असल्याने नागरिकांनी तक्रार केली. त्याची दखल घेऊन चित्रीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली. परवानगीचा अभाव : प्रशासनाकडून कारवाई स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर चित्रीकरण थांबविण्यात आले. त्यामुळे अभिनेत्री तब्बूला चित्रीकरण अर्धवट सोडून तिथून परतावे लागले. वाहतूक पोलिसांची पूर्व परवानगी घेऊन चित्रीकरण सुरू केले असल्याचा दावा निर्मात्याच्या वतीने करण्यात आला. मात्र, वाहतूक शाखेची परवानगी असली तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याने चित्रीकरण थांबविणे भाग पडले.