शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावती रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक लूट होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड-शिवापूर येथील टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत एका नागरिकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलिसांनी टोल नाक्यावर स्टिंग ऑपरेशन करून टोलवरील बनावट पावतीची सत्यता बाहेर आणून रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात सात कर्मचाऱ्यांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावरील बनावट पावती देऊन नागरिकांना लुटणाऱ्या टोळीबाबत अभिजित वसंत बाबर (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची लूट करून फसवणूक केल्याप्रकरणी सुदेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा. वी. धोम कॉलनी, ता. वाई), अक्षय तानाजी सणस (वय २२, रा. नागेवाडी, ता. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (वय १९, रा. जनता वसाहत), साई लादुराम सुतार (वय २५, रा. दत्तनगर, कात्रज), हेमंत भाटे, दादा दळवी व सतीश मरगजे (पूर्ण नाव व पत्ता नाही) व इतर टोलवरील कर्मचाऱ्यांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

अभिजित बाबर हे पुण्यातून स्वतःच्या चारचाकी वाहनातून साताऱ्याला जात असताना दि.१६ व २० फेब्रुवारी रोजी खेड-शिवापूर टोलनाक्यावर १९० आणि आणेवाडी टोलनाक्यावर १३० रुपयांचा जाताना व परत येताना टोल कर्मचाऱ्यांनी पावती दोन्हीवेळी दिली होती. अनेक वाहनचालकांना अशाच प्रकारे पावती देऊन वाहने सोडली जात होती. यावेळी बाबर यांना खेड-शिवापूर व आनेवाडी टोलवरील पावतीच्या साईजबाबत संशय आल्याने त्यांनी फसवणुकीबाबत पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत तक्रार केली होती. याची शहानिशा करण्यासाठी बुधवारी (दि.२४) रात्री ८.३० च्या सुमारास खेड-शिवापूर व आणेवाडी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दोन पथके गुन्हे शाखेने रवाना केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गंधारे, उपनिरीक्षक एस. के. पठाण, नाईक सी. एस. जाधव, अमोल शेडगे, एम. एस. भगत, ए. आर जावळे यांनी कारवाई पथकात सहभागी झाले होते. पुढील तपास राजगड ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहे.

चौकट

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सरकारी वाहन, दोन पंचासह फिर्यादीच्या वाहनात बसून खेड-शिवापूर टोलनाक्यावर सातारा बाजूकडे जाताना टोल भरून पावती घेतली. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी १९० टोल रक्कमऐवजी पावती नसेल घ्यायची असेल तर १०० रुपये द्या, अशी मागणीही केली होती. मात्र, फिर्यादीने १९० ची पावती टोलवर घेतली. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजगड पोलिसांच्या मदतीने टोलवरील वेगवेगळ्या लेनवरील कर्मचाऱ्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात पावत्या आढळून आल्या. यावेळी जमा झालेल्या अनेक पावत्या बनावट असल्याचे संबंधित शिफ्ट मॅनेजरने सांगितले. याबाबत टोल व्यवस्थापक अमित भाटिया यांनी टाळाटाळ करत बोलण्यास नकार दिला.

कोट

खेड-शिवापूर टोलनाका हा भ्रष्टाचाराने माखलेला असून याची चौकशी केली तर प्रचंड घोटाळे बाहेर येतील. यासाठी खेड-शिवापूर टोलनाक्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. - ज्ञानेश्वर दारवटकर, कृती समिती निमंत्रक