शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

प्रवासी खेचण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 05:16 IST

पीएमपी प्रशासनाची केवळ घोषणाबाजीच : प्रवाशांच्या संख्येत किंचित घट

पुणे : लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना बससेवेकडे पुणेकरांना आकर्षित करण्यात पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) अपयश आले आहे. पीएमपीची स्थिती सुधारण्याची केवळ घोषणाबाजीच होत राहिल्याने प्रवासी संख्येत वाढ झालेलीनाही. मात्र, अद्यापही सुमारे दहा लाख प्रवाशांचा पीएमपी सेवेवर भरवसा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षांत पीएमपीची दुरवस्था होऊनही प्रवाशांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही स्थिती चांगल्या बससेवेची गरज दर्शविते.पीएमपीकडून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह लगतच्या भागातही बससेवा पुरविली जाते. मागील काही वर्षांपासून लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे. पुणे व पिंंपरी चिंचवड शहरांत शिक्षण व नोकरीसाठी येणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. त्या तुलनेत पीएमपीकडील बस आणि प्रवासी संख्येत मात्र वाढ झालेली नाही.सध्या पीएमपीकडे भाडेतत्त्वावरील बससह सुमारे २ हजार बस आहेत. मागील काही वर्षांपासून त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. आर्थिक वर्ष २०१४-१५मध्ये सरासरी २०८७ बस होत्या. त्यापैकी १३६४ बस मार्गावर होत्या. तर यावर्षी एप्रिल महिन्यात प्रवासी संख्या सुमारे १० लाख १६ हजार एवढी होती. त्यानंतर पुढील तीनही वर्षे प्रवासी संख्येसह एकूण बसची संख्याही थोडी घटल्याचे दिसते.मागील चार वर्षांत २०१५-१६ मध्ये प्रवासी संख्येने १२ लाखांचा टप्पा ओलांडला होता. तर मागील वर्षीच याच महिन्यात ही संख्यासुमारे ११ लाख ६६ हजार एवढी होती. जून ते मार्च या कालावधीमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू असतात. बसने प्रवास करणाºयाविद्यार्थ्यांची संख्याही अधिक असल्याने यादरम्यान बस ओसंडून वाहतात. तर एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी प्रवासी संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अनेकदा ही संख्या १० लाखांच्या खाली जाते.वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रवाशांना सेवा देण्यात ‘पीएमपी’ मागे पडली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. मात्र, काही प्रमाणात नियमित प्रवाशांना कायम ठेवण्यात यश मिळाल्याचे दिसते. अपुरी बससंख्या, बे्रकडाऊन, अनियमितता या कारणांमुळे अनेक नियमित प्रवासी बसकडे पाठ फिरवत असले तरी दरवर्षी नवीन प्रवासी जोडले जात आहेत. त्यामुळे असुविधा होत असूनही प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसत नाही. यावरून लाखो प्रवाशांना बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होते.प्रवासी संख्येत वाढ झाली नसली तरी त्यात लक्षणीय घटही झाल्याचे दिसत नाही. ‘पीएमपी’ प्रशासनाकडून नवीन बससह प्रवाशांना चांगली सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. अधिकाधिक प्रवासी आकर्षित करण्यासाठी नवीन मार्ग सुरू करणे, बस वाढविणे, ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करणे, पीएमपीची प्रतिमा सुधारणे, अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे ‘पीएमपी’तील अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :Travelप्रवास