शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांच्या बोलण्यात तथ्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे ...

पुणे : केंद्र शासनाविरोधात बोलणाऱ्ंयांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे आणि त्यांना बदनाम करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आता सर्व सामान्य जनतेला समजले आहे. मात्र, नोटीस बजावून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. तसेच राज्यातील सरकार पाडण्यासाठी ईडीकडून दबाव आणून जात असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगत आहेत, याचा अर्थ त्यात तथ्य असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस एस. पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी पाटील पत्रकारांशी बोलत होते. कार्यक्रमास लीला पुनावाला फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पुनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, बाबुराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, डॉ. शाम राजोरे, डॉ. मिलिंद तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अ‍ॅड. भगवान बेंद्रे, जवाहरलाल बोथरा, शशिकांत पवार, दिलीप गिरमकर, दुर्गा देशमुख उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘केंद्र शासनाविरुद्ध बोलणा-यांना बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. परंतु, त्यातून काहीही साध्य होणार नाही.महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीच्या माधमातून दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य खासदार राऊत केले. त्यामुळे यात तथ्य असणारच. तसेच मिशन संपल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर पाटील म्हणाले, त्यांच्याविषयी मी शक्यतो काही बोलत नाही.

दरम्यान, कॅम्प एज्युकेशन सोसायटीने काळाची गरज ओळखून नव्या पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण देण्याचे पाऊल उचलले असून संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील परदेशी भाषा, बेकरी उत्पादन, स्पा यांसारख्या अभ्यासक्रमांमुळे युवकांना सक्षमपणे स्वयंरोजगार सुरू करता येतील, असे गौरवउद्गार पाटील काढले.

संचेती म्हणाले, डॉ. सायरस एस. पुनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून सर्व स्तरांतील विद्यार्थी-विद्याथीर्नींसाठी व्यावसायाभिमुख शिक्षण दिले जाणार आहे.

गौरी प्रभुणे यांनी सूत्रसंचालन, तर दुर्गा देशमुख यांनी आभार मानले.