शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

कारखान्यांची साखरविक्री मंदावली

By admin | Updated: April 14, 2017 04:19 IST

केंद्र सरकारने घेतलेल्या पाच लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीचा परिणाम राज्यातील साखर कारखानदारीवर होताना दिसत आहे. अनेक साखर कारखान्यांची

सोमेश्वरनगर : केंद्र सरकारने घेतलेल्या पाच लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीचा परिणाम राज्यातील साखर कारखानदारीवर होताना दिसत आहे. अनेक साखर कारखान्यांची साखर विक्री मंदावली आहे. साखर आयातीचा धसका घेत भविष्यात साखरेचे दर पडतात की काय, अशी भीती बाळगून कारखानदार क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांचा तोटा सहन करत साखरेची विक्री करत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील कारखानदारांसह ऊसउत्पादक नाराजी व्यक्त करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हंगामात साखरधंद्याला ‘अच्छे दिन’ आले होते. आॅक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशांचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला होता. जानेवारी महिन्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकच संवेदनशील झाल्यामुळे घाऊक बाजारपेठेत साखेरचे दर ४० रुपयांवर गेल्याने साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मावर बडगा उगारला होता. साखरेचे दर रोखा, अन्यथा टोकाची पावले उचलावी लागतील असा इशारा दिला होता. मात्र, साखरेचे दर आवाक्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारने ५ लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे कच्ची साखर आयात केली जाणार आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे.राज्यातील अनेक कारखान्यांनी याची धास्ती घेतली आहे. कच्ची साखर आयात होताच साखरेचे दर पडतील, यामुळे अनेक कारखान्यांनी ५० ते १०० रुपये दर कमी करत साखरविक्रीचा सपाटा लावला आहे. १२ जूनच्या आत साखर आयात केल्यास साखरेचा आयातकर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अंदाजे २ कोटी ३ लाख टनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. १२ जूनपर्यंत आयात केलेली कच्ची साखर भारतामध्ये येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून ती साखर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिना ते दीड महिन्याचा कालावधी लोटणार आहे. सध्या तरी साखर कारखान्यांना या साखरेची भीती नसली, तरी भविष्यात राहणार आहे. (वार्ताहर)- देशाची साखरेची गरज ही २ कोटी ४० लाख टन इतकी आहे. देशात मागील हंगामातील ७७ लाख टन साखर शिल्लक आहे. शिवाय, उत्पादित २ कोटी ३ लाख टन अशी मिळून २ कोटी ८० लाख टन साखर शिल्लक असताना केंद्राने ५ लाख टन कच्ची साखर आयात करण्याची काय गरज होती, असा सवाल कारखानदार आणि ऊसउत्पादक शेतकरी करत आहेत.नवीन हंगाम सुरू होईपर्यंत देशाला साखर पुरून शिल्लक साठा राहील, अशी परिस्थिती असताना साखर आयातीचा निर्णय घाईत घेतलेला दिसत आहे. साखरेचे दर चांगले राहिले, तर शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळाले असते. शिवाय, कारखान्यांनी एफआरपीसाठी घेतलेले सरकारचे कर्ज फेडण्यासाठी मदत झाली असती. या निर्णयाचा फायदा होण्यापेक्षा तोटाच झाल्याचे दिसते. - अशोक पवार(अध्यक्ष, घेडगंगा कारखाना)एकदम साखर आयातीचा निर्णय हा घाईगडबडीने घेतला गेला. यापेक्षा कोटा पद्धत ही याची पहिली पायरी होती. याबाबत सरकारने विचार करायला हवा होता. नवीन हंगाम पाच महिन्यांत येणार आहे. त्यामुळे साखर कमी पडणार होती, असे काही नाही नवीन साखर येणारच होती. याचा फायदा व्यापारी घेत आहेत. विक्रीसाठी ठेवलेली साखर उचलली जात नाही. - पुरुषोत्तम जगताप (अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना)