पावसाची प्रतीक्षा : खरीप हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यतामंचर : आंबेगाव तालुक्यात पावसाचे अद्याप आगमन झाले नसून, ऊन पडत आहे. शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. खरीप हंगामाची कामे खोळंबली आहेत. पावसाने अशीच ओढ दिली, तर खरीप हंगाम लांबण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.मॉन्सूनचे आगमन झाल्याच्या बातम्या कळत आहेत. अगदी पुणे शहरातसुद्धा पाऊस पडला आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यात अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. पूर्व मोसमी पावसाने आठ दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. सातगाव पठार भागात मुसळधार पाऊस पडून वेळ नदीला पूर आला होता. एवढा अपवाद वगळता पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाचे वातावरण तयार होते. आकाशात ढगांची गर्दी होऊन अंधारून येते; मात्र पाऊस पडत नाही, असा अनुभव दररोज येऊ लागला आहे. वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे. खरिपाची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. औतकाठीची जुळवाजुळव झाली होती. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.(वार्ताहर)
शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे
By admin | Updated: June 13, 2015 22:46 IST