शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची तुटपूंजी तरतूद

By admin | Updated: January 11, 2016 01:42 IST

महापालिकेच्या आगामी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकातील ‘सहभागी अंदाजपत्रक’ योजनेमध्ये यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्यांना आवश्यक वाटणाऱ्या कामांची

पुणे : महापालिकेच्या आगामी २०१६-१७ च्या अंदाजपत्रकातील ‘सहभागी अंदाजपत्रक’ योजनेमध्ये यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन त्यांना आवश्यक वाटणाऱ्या कामांची यादी क्षेत्रीय कार्यालयांकडे सोपविली आहे. मात्र, ४ हजार कोटींचे अंदाजपत्रक बनविणाऱ्या पुणे महापालिकेची नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी केवळ ३८ कोटी रुपयांचीच तर तरतूद असल्याने नागरिकांच्या उत्साही सहभागावर पाणी पडण्याची शक्यता आहे.पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये २००६ पासून सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या प्रभागातील कोणत्या समस्या प्राधान्याने सोडविल्या गेल्या पाहिजेत, त्याकरिता कोणती कामे झाली पाहिजेत, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची संधी याद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या प्रभागातील ड्रेनेज, रस्ते, पाणी, रस्त्यावरील दिवे यासह अनेक आवश्यक कामे सुचविण्याची संधी यातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी २०१६-१७च्या अंदाजपत्रकातील सहभागी अंदाजपत्रक योजनेमध्ये कामे सुचविण्यासाठी ३१ सप्टेंबर २०१५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. नागरिकांनी त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद देत त्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुचविली आहेत. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून या कामांची छाननी करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. याचा सविस्तर अहवाल तयार करून आयुक्तांना सादर केला जाणार आहे. सहभागी अंदाजपत्रक योजनेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता जनवाणी, सीईई या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जात असलेल्या प्रयत्नांमुळे सहभागाचा टक्का वाढत चालला आहे. यंदाच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकासाठी ६ हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या सूचना, शिफारशी महापालिकेकडे केल्या होत्या. नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यासाठीची तरतूद मात्र केवळ ३८ कोटी रुपये इतकीच आहे. वस्तुत: महापालिकेचे अंदाजपत्रक १५०० कोटी रुपयांवरून ४ हजार कोटींचा टप्पा गाठत असताना नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठीही वाढ अपेक्षित होती. मात्र, नगरसेवकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यामध्ये वाढ झालेली नाही. (प्रतिनिधी)