शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 05:24 IST

राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त राहणार असल्याने तंत्र शिक्षण संचालनालयाकडून अतिरिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त राहणार असल्याने तंत्र शिक्षण संचालनालयाकडून अतिरिक्त कॅप फेरी राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया बुधवार (दि.१९) पासून सुरू झाली असून, गुरुवारी (दि.२०) आॅनलाइन अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. राज्य सीईटी कक्षामार्फत प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेची कॅपची (केंद्रीय प्रवेशप्रक्रिया) तिसरी फेरी सध्या सुरू आहे; मात्र प्रवेश क्षमता आणि या टप्प्यात आलेल्या अर्जांच्या संख्येचा विचार करता हजारो जागा रिक्त राहणार आहे. तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कक्षामार्फत प्रवेशाची अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. १९) ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत सुरुवातीला केवळ तीन कॅप फेऱ्या होतील, असे स्पष्ट करण्यात आले होते; पण रिक्त जागांची स्थिती पाहून ही अतिरिक्त चौथी फेरीही घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.विविध कारणांमुळे आॅनलाइन प्रक्रियेत सहभागी न झालेले विद्यार्थी, कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, तसेच विविध कारणांमुळे अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या टप्प्यात नव्याने अर्ज करता येणार आहेत. दि. २० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील.याच कालावधीत सुविधा केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चित करावा लागणार आहे. त्यानुसार रात्री आठ वाजता अतिरिक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. २२ जुलैपर्यंत पसंतीक्रम भरावे लागतील. त्याआधारे २४ जुलैला निवड यादी जाहीर केली जाईल. या विद्यार्थ्यांना नियमित तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेश दिला जाईल.