शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By admin | Updated: July 30, 2016 04:59 IST

गर्भलिंग तपासणी करून पत्नीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी बारामती तालुक्यात ग्रामसेवक पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक

बारामती : गर्भलिंग तपासणी करून पत्नीला दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी बारामती तालुक्यात ग्रामसेवक पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी सक्रिय असलेल्या टोळीचा पाठपुरावा घेत असताना भिगवण पोलिसांनी दोन डॉक्टरांसह दोन महिला, ड्रायव्हर ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या तीन चारचाकी गाड्यादेखील ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी कारवाई करून म्हसवडच्या दोन डॉक्टरांसह भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील महिला, ड्रायव्हर आणि त्यांच्या तीन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या. या टोळीकडून अनेक गंभीर बाबींचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आज सकाळी कारवाई केल्यानंतर सायंकाळी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, याबाबतची गोपनीयता भिगवण पोलिसांनी बाळगली होती. भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आणखी काही बाबींची माहिती शनिवारी मिळणार आहे, असे सांगितले. स्त्री गर्भाची गर्भपात करणारी टोळीच ताब्यात आल्याने त्यांच्याकडून झालेल्या अनेक गंभीर बाबी उघड होतील, तसेच अन्य भागातील धागेदोरेदेखील मिळणार आहेत. डॉ. एकनाथ इरप्पा चंदनशिवे, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. तुषार पिंताबर गाडे (वय ५४, रा. म्हसवड, जि. सातारा), डॉ. हनुमंत ज्ञानेश मोरे (वय ५४, कोरगाव, जि. सातारा), संतोष किसन जाधव (रा. खडकी पाटोळे, जि. सातारा), काशिनाथ किसन मोरे (रा. खडकी, ता. दौंड) तर गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्या दोघी माळशिरस तालुक्यातील आहेत. डॉक्टरांची गाडी (क्रमांक एमएच ११/बीव्ही २८७३), एमएच ४५/अ‍े ०२९ या गाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)