शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कष्टक-यांच्या नशिबी शोषण

By admin | Updated: November 19, 2014 04:30 IST

सर्वाधिक मिळणारे बिगारी काम हे अतिश़य कष्टाचे असते. दिवसभर डोक्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहने, रेती टाकणे, रेती चाळणे,

सर्वाधिक मिळणारे बिगारी काम हे अतिश़य कष्टाचे असते. दिवसभर डोक्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहने, रेती टाकणे, रेती चाळणे, गिट्टी भरणे तसेच रेती, गिट्टी, व सिमेंटचे मिश्रण तयार करणे, आदी कामाचा त्यात समावेश होतो. गवंडीकाम करण्यात कष्टासह कौशल्य पणाला लागते. विटा वाहणे, खडी व दगड टाकणे, रस्त्याच्या कामाला डांबर टकणे, बिगारी काम करणे, खोदकाम करणे, काँक्रिटीकरणाची कामेही करावी लागतात. इमारतींच्या पाचव्या-सहाव्या मजल्यावर सिमेंटच्या गोण्या न्याव्या लागतात. ही अंगमेहनतीची तसेच पडेल ती कामे सर्वच कामगारांना करावी लागतात. मजूरांना अनेकदा खोदकाम करावे लागते. घरासाठी पाया खोदणे, शेतीला कुंपण घालणे अथवा झाडे लावण्यासाठी मुरुम, खडक फोडून खोदकाम करण्याची कामे दिवसभर करावी लागतात. टिकाव, फावडे व पहारीच्या साहाय्याने अशी कामे करताना अनेकदा मजुरांच्या तळहातावर फोड येतात. मात्र त्या वेदना सहन करूनही दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर हजर राहण्यावाचून पर्याय नसतो. काही ठिकाणी माती काढायची असे सांगून झिरपा पद्धतीच्या स्वच्छतागृहाच्या टाक्यांमधील मैलाही काढण्यास लावले जात असल्याचे अनुभव कामगारांनी सांगितलं. कोणाच्याही नशिबी नकोत अशी कामे घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी निमुटपणे करावी लागतात. समाजाचा मजुरांकडे पाहण्याचा दष्टिकोन बदलत आहे. महिला व पुरूषांना काम करताना शिवीगाळ करणे, महिलांप्रति ठेकेदाराचे वर्तन असभ्य असण्याचा प्रत्यय नेहमी येतो. निरक्षरतेमुळे त्यांच्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन चांगला नसतो. काही ठेकेदार व काम देणारे परिस्थिती समजून काम करून घेतात. विशेषत: शेतीकामे करताना शेतकऱ्यांकडून मजुरांना जेवणाची सोय करून दिल्याने मायेचा ओलावा कधीतरी अनुभवास येतो. बांधकाम क्षेत्रातही नेहमीचा परिचय असणारे व कष्टाची जाण असणारे ठेकेदार कामाचा योग्य मोबदला देतात. शहरात गवंडीकामास ७०० रूपये, बांधकामास ६००, पुरूष बिगारी ४००, स्त्री बिगारी ३००, खोदकामास ४०० रूपये दर आहे. मात्र ठेकेदार शोषण करतात तेंव्हा गवंडीकामास ५०० रूपये, बांधकामास ४००, पुरूष बिगारी ३००, स्त्री बिगारी २००, तर खोदकामास ४०० दिले जातात.