पुणो : पुणो महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपी) खासगी ठेकेदारांकडे कंत्रटी पद्धतीने काम करणा:या चालकांचे आर्थिक शोषण होत आहे. नियमानुसार ‘पीएमपी’मध्ये कायम चालकांना मिळणा:या वेतनाइतके वेतन या चालकांना मिळणो अपेक्षित आहे. मात्र, ठेकेदारांकडून त्यांना राबवून घेतले जात असताना पुरेपूर मोबदला दिला जात नाही.
पीएमपीने चौथ्या टप्प्यात पाच खासगी ठेकेदारांकडून सुमारे 65क् बस भाडेपद्धतीने घेतल्या आहेत. या बसेसवर सुमारे 13क्क् ते 14क्क् चालक कंत्रटी पद्धतीने काम करतात. पीएमपीतील कायम चालकांप्रमाणोच कंत्रटी चालकांना काम करावे लागते. मात्र, दोन्ही चालकांच्या वेतनामध्ये मोठा फरक आहे. कंत्रटी कामगार (नियमन व निमरूलन) अधिनियम 197क् मध्ये कंत्रटी कामगारांचे होणारे शोषण थांबवून त्यांना सोयीसुविधा प्राप्त करून देण्यासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनानेही संबंधित आस्थापनांना या तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सहा महिन्यांपूर्वीच दिले आहेत. ‘मुख्य मालकाकडील नियमित कामगार अथवा कर्मचारी करीत असलेल्या कामाचे स्वरूप व कंत्रटदाराने नियुक्त केलेले कंत्रटी कामगार करीत असलेल्या कामाचे स्वरूप हे एकसारखे असल्यास त्या कामासाठी कंत्रटी कामगारांना देण्यात येणारे वेतन व इतर लाभ हे मुख्य मालकाकडील नियमित कामगारांना देण्यात येणा:या वेतनापेक्षा कमी नसावे व त्याबाबतची खात्री मुख्य मालकाने करावी’ असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
पीएमपीतील कायम चालकांना प्रतिदिन सुमारे 675 रुपये वेतन दिले जाते. तर खासगी ठेकेदारांकडून कंत्रटी चालकांना केवळ 35क् ते 4क्क् रुपये दिले जातात. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना खासगी ठेकेदाराकडील एका चालकाने सांगितले की, मी दोन वर्षापासून दोन ठेकेदारांकडे चालक म्हणून काम करीत आहे. एका ठेकेदाराकडे मला 38क् रुपये, तर दुस:याकडे 4क्क् रुपये प्रतिदिन वेतन मिळते.
पूर्वी केवळ 3क्क् रुपये मिळत होते. तसेच इतर भत्ते किंवा कायम चालकांना मिळणारे फायदे मिळत नाहीत. ते चालक जेवढे काम करतात, तेवढेच काम आम्हालाही करावे लागते. मात्र, वेतनामध्ये मोठा फरक आहे. हातात दुसरे काम नसल्याने नाइलाजाने त्यांच्याकडेच काम करावे लागते. काही वेळा वेतनही वेळेत मिळत नाही. (प्रतिनिधी)
4मुख्य मालक म्हणून कंत्रटी चालकांच्या ठेकेदारांकडून होणा:या पिळवणुकीला पीएमपी प्रशासन जबाबदार आहे. नियमानुसार या कामगारांना पुरेपूर मोबदला मिळत नसेल तर त्याची पूर्ण जबाबदारी मुख्य मालकाची म्हणजे पीएमपीची आहे. मात्र, त्याबाबत पीएमपी प्रशासनाकडे वांरवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले गेले, असे महाराष्ट्र कामगार मंचचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी सांगितले.
ठेकेदारांना नोटीस
किमान वेतन कायद्यानुसार सर्व कर्मचा:यांना समान वेतन मिळणो अपेक्षित आहे. त्यानुसार सर्व ठेकेदारांना काही दिवसांपूर्वी नोटिसा पाठविण्यात आल्या असून, वेतनाबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. त्यावर त्यांचे उत्तर मिळल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. कायद्यानुसार वेतन दिले जात नसेल तर संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रवीण अष्टीकर
सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी