डिंभे : आंबेगाव तालुक्याचा आदिवासी भाग पर्यटकांना भूरळ घालीत आहे. पोखरी घाट व येथून दिसणारे डिंभे धरण व गोहे पाझर तलावाचे नयनरम्य चित्र हा परिसर सध्या हिरवाईने नटला आहे. त्यातच सकाळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे या भागातील चित्रच पालटले असून या परिसराची सैर करता काश्मिरच्या पर्यटनाचा आनंद सध्या पर्यटकांना मिळत आहे.आदिवासी भागाचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या डिंभे गावाच्या पुढे निघाल्यावर खऱ्या अर्थाने या भागातील निसर्गसौंदर्याचा आनंद मिळतो. येथून पुढे डाव्या बाजूला रस्ता वळतो तो जातो श्री क्षेत्र भीमाशंकरकडे तर उजव्या बाजूचा रस्ता डिंभे धरणाला वळसा घालीत आडिवरे, आहुपे या दुर्गम भागातील खेड्यांकडे. याच रस्त्यावर पुढे माळीण हे गाव लागते. डिंभे धरणाच्या कडेकडेने जाणारा वळणावळणाचा रस्ता व या रस्त्यावर जागोजागी लागणारी भातशेती, डिंभे जलाशयाचे विस्तीर्ण जलाशय या भागाची सफर करताना मन वेधून घेतल्याशिवाय रहात नाही. डाव्या बाजूकडील रस्त्याने साधारणता दोन किमीवर गेल्यावर सुरू होतो तो पोखरी घाट. सध्या हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.
काश्मीरच्या पर्यटनाचा अनुभव आंबेगावात
By admin | Updated: August 19, 2015 00:00 IST