शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विस्तृत विधायक काम करावे

By admin | Updated: January 19, 2016 01:46 IST

समाजात सामाजिक बांधिलकीतून कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर थाप म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

दौंड : समाजात सामाजिक बांधिलकीतून कामकाज करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर थाप म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही निश्चितच समाधानाची बाब आहे. तेव्हा पुरस्कारार्थींनी पुरस्काराचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले सामाजिक काम विस्तृत केले पाहिजे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. दौंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दौंड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर कुलकर्णी यांनी असोसिएशनचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय कामाचा प्रास्ताविकात आढावा घेतला. या वेळी वीरधवल जगदाळे, वासुदेव काळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समादेशक संजय शिंत्रे, समादेशक बोराडे, डॉ. जयसिंग थोरात, डॉ. श्यामराव कुलकर्णी, डॉ. अशोक पाटील, डॉ. राहुल जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. मीना भट्टड, पल्लवी कुलकर्णी, रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. दौंड मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवस घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्यविषयक चर्चासत्र झाले. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. डी. एस. लोणकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. एल. एस. बिडवे, राजाभाऊ कुलकर्णी, डॉ. समीर कुलकर्णी, डॉ. जयसिंग थोरात उपस्थित होते. चर्चासत्रात डॉ. क्षितिजा कुलकर्णी, डॉ. संजीव करंडे, डॉ. शलाका करंडे, डॉ. प्रेमकुमार भट्टड, चैतन्य जोशी, डॉ. सुमीत शहा, डॉ. प्रवीण गांजणे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दौंड मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य मिळाले.पहिल्या दिवशी मनोहर बोडखे यांचा ‘हास्यतडका’ हा विनोदी कार्यक्रम झाला. त्यानंतर चैत्राली अभ्यंकर यांचा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम, तर दुसऱ्या दिवशी शकीर शेख यांचा सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम झाला.