शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूडमध्ये विदेशी वृक्ष ‘चले जाव’

By admin | Updated: June 14, 2014 00:12 IST

देशी झाडांच्या वाढीला अडथळा ठरणारे विदेशी वृक्ष नष्ट करण्याची मोहीमच वन विभागाने उघडली आहे

माऊली म्हेत्रे, कोथरूडपुण्यातील डोंगरटेकड्यांवर दृष्ट लागण्यासारखी वनराई आजही शाबूत आहे; पण काही वर्षांपूर्वी केवळ प्रयोग म्हणून किंबहुना अस्तित्व जोपासण्यासाठी म्हणून लागवड करण्यात आलेली विदेशी झाडे देशी झाडांच्या मुळावर उठली आहेत. त्यामुळे देशी झाडांच्या वाढीला अडथळा ठरणारे विदेशी वृक्ष नष्ट करण्याची मोहीमच वन विभागाने उघडली आहे. कोथरूड भागातील निर्जन डोंगरमाथ्यावरील विदेशी वृक्ष तोडून निंब, आवळा वड, पिंंपळ या देशी वृक्षांची लागवड करून वृक्षांची स्वदेशी चळवळ राबविण्यात येत आहे. ग्रिलिसिडिया ही विदेशी झाडे पुणे परिसरातील डोंगरमाथ्यावर फोफावली आहेत. काही ठिकाणी तर या झाडांची बनेच तयार झाली आहेत; पण अतिशय कठीण मुळे असणारी आणि जागा व्यापाणारी ही झाडे आजूबाजूला इतर झाडे वाढू देत नाहीत. शिवाय, पर्यावरणदृष्ट्या ही झाडे फायदेशीर नाहीत; उलट फायदेशीर अशा देशी झाडांचे अस्तित्वच ही झाडे नष्ट करतात. पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास ही झाडे कारणीभूत ठरत असल्याची भीती पर्यावरणवाद्यांकडून अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.या कारणामुळेच केंद्र शासनाची परवानगी घेऊन विदेशी जातीची झाडे नष्ट करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी जीत सिंंग यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘डोंगरटेकड्यांवरील खडकाळ भागावर ग्रिलिसिडियाची लागवड करण्यात येते. या भागातील जमीन देशी वृक्षांची लागवड करण्यास योग्य झाल्यानंतर केद्र शासनाच्या आदेशानुसार विदेशी झाडांची ठराविक प्रमाणात तोडणी करून देशी झाडे लावली जातात. सध्या पुणे वन विभागाला १,००० विदेशी झाडांच्या ऐवजी देशी झाडे लावण्याची परवानगी देण्यात आली असून, वन विभागाच्या वतीने विदेशी झाडे तोडून देशी झाडांची लागवड करण्यात येत आहे.’’वन विभागाच्या या धोरणात्मक निर्णयानुसार कोथरूडचा म्हातोबानगरचा डोंगरमाथा हा सर्वांत हिरवळीचा भाग तयार झाला आहे. आत्ता या भागात नव्यानेच ३ ते ४ वर्षे आयुष्य असलेली देशी झाडे लावण्यात येणार आहेत.कोथरूड भागातील स्थानिक लोकांकडून या डोंगराचा वापर केला जात असून, वृक्षतोडीमुळे अनेक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, ही वृक्षतोड नसून वृक्ष संवर्धनाचीच मोहीम असल्याचे समजल्यावर समाधानही व्यक्त करण्यात येत आहे.