शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईमधून वीजबिल माफ करा

By admin | Updated: February 24, 2016 03:30 IST

रंदर उपसा सिंचन योजना तसेच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे टंचाईग्रस्त भागात जनावरांना चारा पिकविण्यासाठी जो पाणीपुरवठा केला जातो,

नारायणपूर : पुरंदर उपसा सिंचन योजना तसेच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनांद्वारे टंचाईग्रस्त भागात जनावरांना चारा पिकविण्यासाठी जो पाणीपुरवठा केला जातो, त्यासाठी येणारे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पुरंदर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मागील कार्यवाहीची माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.पुरंदर तालुक्यामध्ये १२ टँकर चालू असल्याची कागदोपत्री नोंद आहे. परंतु नियोजनाअभावी कमी खेपा होतात, याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या संभाजी सभागृहात १६ फेब्रुवारी रोजी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली होती. या वेळी पाण्यासंदर्भात समस्यांचा पाढा वाचला होता. त्या वेळी सुळे यांनी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत बोलून काहीतरी मार्ग काढू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी ही बैैठक घेण्यात आली. गुरुवारी होणाऱ्या बैैठकीत तातडीने निर्णय घेतले जातील, असेही या वेळी राव यांनी सांगितले.या वेळी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे महिला पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, जि. प. सभापती सारिका इंगळे, तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, विराज काकडे, माजी सभापती गौरी कुंजीर, माणिकराव झेंडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक मोहन जगताप, ईश्वर बागमार, बापू भोर, बाजीराव कुंजीर, गणेश होले, महादेव शेंडकर, जितेंद्र देवकर, विजय कुंजीर, राजेंद्र धुमाळ आदी उपस्थित होते.चारा छावण्या चालू व्हाव्यात, ही मागणी काही सरपंचांनी केली. यावर प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून शासनाला अहवाल सादर केला आहे. संबंधित सरपंच व पदाधिकारी यांना बोलावून निर्णय घेतला जाईल.पुरंदर उपसामधून सोडले जाणारे पाणी अतिशय दूषित झाल्यामुळे आरोग्याचा धोका संभवतो. त्यामुळे फिल्टर प्लान्ट शिंदेवाडी येथे बसविण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केली. यावर राज्यशासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना उद्भव चुकल्यामुळे बंद पडल्या आहेत. सदर योजना कार्यान्वित झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होईल, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे व पदाधिकाऱ्यांनी केली. सदर योजनांचा नव्याने सर्व्हे करून कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.