शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागातील हिरवा चारा संपुष्टात

By admin | Updated: January 9, 2017 02:02 IST

डोंगरावरील चारा वाळू लागल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा आॅक्टोबर महिन्यापासूनच डोंगर उघडे बोडके दिसू लागले आहेत.

डिंभे : डोंगरावरील चारा वाळू लागल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा आॅक्टोबर महिन्यापासूनच डोंगर उघडे बोडके दिसू लागले आहेत. याचा परिणाम पाळीव जनावरांच्या चाराटंचाईवर होणार असून हिरव्या चाऱ्याअभावी आदिवासी भागातील दूधव्यवसाय अडचणीत येणार आहे. पाळीव जनावरे जगविण्यासाठी यंदा आदिवासी शेतकऱ्यांना कसरत करावी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात, नाचणी, वरईच्या शेतीबरोबर संसारप्रपंचाला हातभार लावण्यासाठी काहीअंशी दूधव्यवसाय केला जातो. गावठी गाई व म्हशींपासून मिळणाऱ्या दुधावर येथील शेतकऱ्यांना दोन पैसे उपलब्ध होतात. परंतु या शेतकऱ्यांना इतर समस्यांबरोबरच पाळीव जनावरांच्या चारा-पाण्याचीही टंचाई नेहमीच जाणवत असते. पावसाळा सुरू झाला, की डोंगरावरील चारा व झाडपाल्याच्या रूपाने जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याचा प्रश्न सुटतो. पुढे आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत डोंगरावरील हिरवा चारा व गवत कापून शेतकरी जनावरांच्या उन्हाळी चाऱ्याची व्यवस्था करताना पाहावयास मिळतात.परंतु यंदा या भागातून पावसाने लवकर काढता पाय घेतला. याचा फटका भातशेतीला तर बसलाच. मात्र आता डोंगरावरही चाराही लवकर वाळून गेल्याने या परिसरातील अनेक डोंगर आॅक्टोबर महिन्यापासूनच उघडे बोडके होऊ लागल्याचे पाहावयास मिळाले. सध्या तर अनेक डोंगरावरील चारा वाळून संपुष्टात येऊ लागला आहे. डोंगर मोकळे होऊ लागले असून सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. उन्हाळी हंगाम अजून सुरू व्हावयाचा असल्याने चाऱ्याअभावी रिकामे होऊ लागले आहेत. पुढील पावसाळा सुरू होण्यास अजून अर्ध्या वर्षाहून अधिक काळ बाकी असताना शेतकऱ्यांना भेडसावू लागलेली चाराटंचाई ही चिंतेची बाब होऊन बसली आहे. (वार्ताहर)