शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या प्रकरणातल्या मुलीच्या लॅपटॅापमध्ये खळबळजनक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मंत्र्याशी संबंधित आत्महत्या प्रकरणातल्या मुलीच्या लॅपटॅापमध्ये खळबळजनक माहिती असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मंत्र्याशी संबंधित आत्महत्या प्रकरणातल्या मुलीच्या लॅपटॅापमध्ये खळबळजनक माहिती असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

संबंधित मंत्र्याचे नाव घेण्याचे टाळतानाच त्यांनी ही माहिती पोलिसांनी जाहीर करावी; अन्यथा दोन-तीन दिवसांमध्ये ती लोकांसमोर येईलच असे म्हटले आहे. गुरुवारी (दि. ११) ते पुण्यात 'लोकमत'शी बोलत होते.

पुण्यात रविवारी एका २२ वर्षीय तरुण मुलीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीतल्या विदर्भातील एका मंत्र्याचा थेट संबंध असल्याचा आरोप होतो. या मुलीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

या संदर्भात पाटील म्हणाले की पोलिसांनी या तरुणीच्या जप्त केलेल्या लॅपटाॅप आणि मोबाईलमध्ये प्रचंड भयानक माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण भयानक असून, यासंबंधी पोलिसांनीच ही माहिती जाहीर करावी, अशी मागणीही पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांचे प्रकरण देखील दाबले गेले असल्याचा दावा करत या आत्महत्या प्रकरणातली माहिती मात्र बाहेर येईलच. ठाकरे-पवार सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या बाबतीत वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तक्रारी आहेत, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात स्वबळाचा नारा दिलेला असतानाच चंद्रकांत पाटील यांनी मात्र मनसेने भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, असे वक्तव्य केले आहे. "आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. राहिला प्रश्न मनसेचा. त्यांनी त्यांची भूमिका बदलावी हे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांनी जर भूमिका बदलली तर त्यांना सोबत घेऊ, अन्यथा आम्ही एकटेच लढू," असे पाटील म्हणाले. दरम्यान, दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्षांनी भाजप सत्तेत येऊ नये यासाठी कंबर कसली आहे. हे पक्ष अधिकृतपणे एकत्र येणार नाहीत. मात्र सामंजस्याने एकत्रित निवडणूक लढवतील, असे पाटील म्हणाले.

----------------------

चव्हाणांनी वाचलीत का सत्तावीसशे पाने?

मराठा आरक्षणाबाबत आपण उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. मंत्री अशोक चव्हाण यांनी तरी मराठा आरक्षणाचा पूर्ण सत्तावीसशे पानी अहवाल वाचला आहे का," असा प्रश्न त्यांनी विचारला.

---------------------------

पवारांकडून अपेक्षा

मंत्र्यांवरील आरोपांच्या संपूर्ण प्रकरणात शरद पवार यांच्याकडून अपेक्षा असल्याचे म्हणत पवार गप्प का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पाटील म्हणाले की, “रेणु आणि करुणा शर्मा प्रकरणात थेट तक्रार आणि कबुली देवुनही काही झाले नाही. तसेच या प्रकरणातही आता काही होत नाही. पवार नेकीने वागणारे नेते आहेत. मग ते गप्प का? त्यांच्याकडुन आमची अपेक्षा आहे."