शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आप’च्या कार्यकर्त्यांत संचारला उत्साह

By admin | Updated: February 11, 2015 01:02 IST

दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या

पिंपरी : दिल्ली मांगे दिल से, केजरीवाल फिर से अशा जोरदार घोषणाबाजीने पिंपरी परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांचा निनाद, आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करणारे अभियंते कार्यकर्ते म्हणून कारमधून पिंपरीत रस्त्यावर उतरले. डोक्यावर ‘आप’च्या टोप्या, हातात झेंडे, तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह झाडू घेऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जल्लोष साजरा केला. आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या घवघवीत विजयाने हरखून गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी पेढे, पुरणपोळी वाटून आनंदोत्सव साजरा केला. देशात सर्वत्र भाजपच्या लाटेचा करिष्मा दिसून येत असताना, दिल्ली विधानसभा निवडणुुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागांवर विजय संपादन केला. सामान्य जनतेचा कौल मिळविण्यात ‘आप’ने पुन्हा एकदा यश मिळविले. हा सामान्य जनतेचा विजय आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विजयश्री खेचून आणली. भाजपला पिछाडीवर टाकून ‘आप’ने खेचून आणलेली विजयश्री कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी असून, उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी दुपारी ३ ला येथील चौकात जमा झाले. दिल्लीतील विधानसभेचा निकाल स्पष्ट होताच, ‘आप’चे कार्यकर्ते विजयोत्सवासाठी घराबाहेर पडले. काहीजण दुपारनंतर रजा काढून कंपनीतून बाहेर पडले. (प्रतिनिधी)