शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेतील गैरप्रकार; प्राध्यापक बडतर्फ

By admin | Updated: February 1, 2017 05:18 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतल्या गेलेल्या विविध परीक्षांदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी एकूण १० प्राध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे घेतल्या गेलेल्या विविध परीक्षांदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी एकूण १० प्राध्यापक व प्राचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील तीन प्राध्यापकांना बडतर्फ करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे तर काहींना पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आणि परीक्षेचे काम करण्यास बंदी घातली आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे मे २0१६मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या गणित-२ या विषयाच्या परीक्षेदरम्यान तीन प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिकेच्या पानाचा फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फिरवला असल्याची धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांना बडतर्फ करावे. तसेच पुन्हा सेवेत रुजू करून घेऊ नये, अशी शिफारस विद्यापीठाने सिंहगड इन्स्टिट्यूटकडे केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेपर प्राध्यापकांनीच फोडला असल्याचा प्रकार विद्यापीठाने केलेल्या चौकशीदरम्यान समोर आला. तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याप्रकरणी प्राध्यापकांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्याने चार विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरलेले नसताना तसेच त्यांना बैठक क्रमांक नसताना संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने विद्यार्थी हिताचा विचार करून संबंधित प्राचार्यांना विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यापासून प्रति आठवडा १५०० रुपयेप्रमाणे दंड केला. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रिकल मेजरमेंट अ‍ॅण्ड इन्स्ट्रूमेंटेशन विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याने एका प्राध्यापकाला ५ हजार रुपये दंड केला आहे. तसेच तीन वर्षे परीक्षेच्या कामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विळदघाट येथील एका प्राध्यापकावर तसेच नाशिक जिल्ह्यातील पंचवटीच्या फार्मसी महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर एक वर्ष परीक्षेचे काम करण्यास बंदी घातली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे कारवाईचे पत्रक विद्यापीठच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.विद्यापीठातर्फे एम.एस्सी. जैवविविधता या विषयाची ८० गुणांची परीक्षा घेतली जाते. मात्र, आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका ८० गुणांची असताना केवळ ५६ गुणांची तयार केली. त्यामुळे या तीन प्राध्यापकांवर एक वर्ष परीक्षेचे कामकाज पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे.